शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

बालभारतीच्या पुस्तकांना पानांचे वजन सहन होईना; तीनच दिवसांत पाने साथ सोडू लागली

By प्रशांत तेलवाडकर | Updated: June 19, 2023 16:41 IST

निष्कृष्ट बांधणीने तीनच दिवसांत फाटू लागले नवीन पुस्तक

छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी बालभारतीने यंदा अभिनव प्रयोग केला. ६ विषयांचे एकच पुस्तक तयार केले. पण निकृष्ट बांधणीमुळे पुस्तकाला २०० पानाचे ओझे सहन होईना, शाळा सुरू होऊन तीन दिवसात पुस्तकाची पाने साथ सोडू लागली आहेत. यासंदर्भात विद्यार्थी-पालक शाळेत तक्रार करीत आहेत; पण ‘घरीच पुस्तकाला पाने चिटकवून घ्या’ असा सल्ला शिक्षक देत आहेत. यामुळे पुस्तक बांधणीच्या गुणवत्ता तपासणीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक धोरणानुसार ‘एकात्मिक पाठ्यपुस्तक योजना’ या पथदर्शी प्रकल्प यंदा राबविण्यात येत आहे. विद्यार्थी एकाचवेळी सर्व विषयांचे पुस्तक दप्तरात नेत असे. त्याऐवजी सर्व विषयाचे मिळून एकच पुस्तक तयार करण्यात आले. मराठी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवीसाठी पाठ्यपुस्तकांचे चार भाग तयार करण्यात आले. चारही पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात आली आहेत. त्यातील भाग पहिला विद्यार्थी शाळेत घेऊन जात आहे. इयत्ता सातवीच्या पुस्तकात पहिल्या भागात १९४ पाने देण्यात आली आहेत. शाळा सुरू होऊन तीन दिवस झाली. वारंवार एकच पुस्तक हाताळले जात असल्याने पुस्तकाची पाने वेगवेगळी होऊ लागली आहेत. एकच नाही तर प्रत्येक शाळेत पुस्तक फाटल्याची तक्रारी विद्यार्थी करीत आहेत. काही पालकांनी पाने चिटकविली, तर काही पालकांनी जाड दोऱ्याने पुस्तक बांधण्याचा प्रयत्न करीत आहेत. बालभारती पुस्तकांची बांधणीची गुणवत्ता तपासते की नाही, असा प्रश्न आता यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. फाटके पुस्तक घेऊन विद्यार्थ्यांनी शाळेत जावे का, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत.

निकृष्ट बांधणी हेच मुख्य कारणविद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व विषयाचे एक पुस्तक असावे, ही चांगली कल्पना आहे. मात्र, एक पुस्तक २०० पानाचे झाले आहे. पुस्तक बांधणी ‘परफेक्ट बायडिंग’ या प्रकारातील आहे. पुस्तकाचे मागील भागात ‘गिल्व्ह’ (चिकट पदार्थ) लावून पाने व वरील कव्हर चिटकविले जाते. यात शिलाई कुठेच नसते किंवा पिनसुद्धा मारलेली नसते. ज्यावेळी पुस्तकाला २०० पेक्षा जास्त पाने होतात. तेव्हा चांगल्या दर्जाचे ‘गिल्व्ह’ वापरायला पाहिजे. म्हणजे पाने निघत नाही. मात्र, निकृष्ट गिल्व्ह वापरल्याने बालभारतीच्या पुस्तकाचे पाने निघत आहेत. पालकांकडून तशा तक्रारी येऊ लागल्या आहेत.- अविनाश फरसुले, व्यावसायिक

बालभारतीच्या भंडार व्यवस्थापकाकडे तक्रार दाखल करामहाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ व पुस्तक बांधणीचे टेंडर घेणाऱ्यांमध्ये करार झालेला असतो, त्यानुसार पुस्तक खराब निघाले तर ते बदलून दिले जाते. पुस्तक विनाअनुदानित शाळांना बालभारतीचे पुस्तक व्यापारी विकतात. खराब, फाटलेले पुस्तक, खराब प्रिंटिंग असेल तर ते पुस्तक आम्ही बालभारतीच्या भंडार व्यवस्थापकांना परत करतो व त्या बदल्यात नवीन पुस्तक दिले जाते. शाळेतील शिक्षकांची जबाबदारी आहे की, त्यांनी मोफत मिळालेले पुस्तक पाठ्यपुस्तक मंडळाला द्यावी व नवीन पुस्तके विद्यार्थ्यांना द्यावी.- सुनील अजमेरा, सहसचिव, जिल्हा व्यापारी महासंघ

टॅग्स :Educationशिक्षणStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद