शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मराठवाड्याच्या पाणीप्रश्नाची लढाई जोमाने लढावी लागेल: संजय शिरसाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2025 19:18 IST

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मसिआ आणि टीम ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात रविवारी दुसरी जलसंवाद परिषद पार पडली.

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्याने पाणी मागताच, अहिल्यानगर आणि नाशिकचे पुढारी हे पाणी जणू पाकिस्तानला चालले आहे, अशा पद्धतीची भूमिका घेतात. आम्ही आमच्या हक्काचे पाणी मागतोय. पक्षीय लेबल बाजूला ठेवून मराठवाड्याचे सर्व आमदार, खासदार एकत्र आले तरच पाणीप्रश्न सुटेल, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी रविवारी येथे जलसंवाद परिषदेत केले.

मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, मसिआ आणि टीम ऑफ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी चिकलठाणा एमआयडीसीतील मसिआच्या सभागृहात रविवारी दुसरी जलसंवाद परिषद पार पडली. पालकमंत्री संजय शिरसाट, आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, धाराशिवचे आ. कैलास पाटील, आ. अनुराधा चव्हाण, माजी आ. राजेश टोपे, सा. बां. विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, जलतज्ज्ञ डॉ. या. रा. जाधव, संजय लाखे पाटील, आयोजक डॉ. शंकर नागरे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, रमाकांत पुलकुंडवार, अभियंता जयसिंह हिरे, सर्जेराव वाघ आणि महेंद्र वडगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोपट्यांना पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. संजय शिरसाट म्हणाले की, पाणीप्रश्नासंदर्भात अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांतील जनतेचा उठाव नाही, परंतु तेथील पुढारी जाणूनबुजून माथी भडकवण्यासाठी मराठवाड्याला पाणी देण्यास विरोध करतात आणि त्यांचा प्रदेश सुजलाम्, सुफलाम् करण्यासाठी प्रयत्न करतोय, हे दाखवतात. या परिषदेकडे मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी पाठ फिरवल्याबाबत ते म्हणाले की, जनता पाण्याच्या प्रश्नांवर कान टोचत नसल्याने त्यांना गांभीर्य नाही. रमाकांत पुलकुंडवार यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नागरे, हिरे आणि वडगावकर यांनी मराठवाड्याच्या जलस्थितीचे सादरीकरण केले.

दबाव गट करावाआजपर्यंत आयोजित सर्व पाणी परिषदेला आलो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलेल्या जीआरमध्ये समन्यायी पाणीवाटपाबाबत उल्लेख आहे. मराठवाड्याच्या दृष्टीने असलेल्या गोष्टी त्यात आहेत. त्यांची अंमलबजावणी व्हावी. मराठवाड्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी दबावगट निर्माण करावा.- राजेश टोपे, माजी मंत्री

मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी एकत्र यावेमराठवाड्यातील सर्वच लोकप्रतिनिधींनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यांना याबाबत कळत नाही की जाणून घ्यायची इच्छा नाही? एकूणच जनरेटा त्यांच्यामागे नाही. म्हणूनच ते याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते. समन्यायी पाणीवाटप कायद्यानुसार मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांना पाणी मिळावे.- आ. कैलास पाटील

आमच्या धरणातून शहापूरला पाणी नकोदुष्काळग्रस्त वैजापूर, गंगापूर आणि कोपरगाव तालुक्यांसाठी नाशिक जिल्ह्यात बांधलेल्या भाम, वाकी, भावली आणि मुकणे इ. धरणांतील पाणी २५ टक्के पाणीही आम्हाला मिळत नाही. कायद्यानुसार हे पाणी देता येत नाही. असे असताना मुबलक पाणी असलेल्या शहापूरला आमच्या प्रकल्पावर पाणीपुरवठा याेजना आणली, हे कायद्याच्या विरोधात आहे.- आ. रमेश बोरनारे

मराठवाड्यातील आमदारांनी एकत्र येणे गरजेचेमराठवाड्यातील सर्व पक्षीय आमदारांनी एकत्र येऊन पाणीप्रश्न सोडविणे शक्य आहे, कारण आपली बाजू सत्याची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मराठवाड्याला देण्यास तयार आहेत, परंतु मराठवाड्यातील आमदारांची साथ नसल्याने तेही काही करू शकत नसल्याचे दिसते. यातून मराठवाड्याचे नुकसान होतेय.- आ. प्रशांत बंब

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSanjay Shirsatसंजय शिरसाटJayakwadi Damजायकवाडी धरण