शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'पोटशूळ उठला असेल'; पृथ्वीराज चव्हाणांच्या टीकेवर अब्दुल सत्तारांचे जोरदार प्रतिउत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 14:22 IST

मंत्रीमंडळ विस्ताराआधी माझी बदनामी करणाऱ्यांकडे पाहतो, कायदेशीर कारवाई केली जाईल

औरंगाबाद: टीईटी घोटाळ्यात समाविष्ट असलेल्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली असून यात शिंदे गटातील आमदार अब्दुल सत्तारांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव असल्याचा दावा करण्यात येत आहे. यावरून सत्तारांवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान, माजी मुख्यमंत्री तथा कॉंग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तर , आता अब्दुल सत्तर यांनाच शिक्षणमंत्री करतील, अशी खोचक टीका केली आहे. यावर सत्तारांनी देखील जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. चव्हाण यांचा पोटशूळ उठला असेल. मला याच्यावर अधिक नाही बोलयाचे, असे सत्तार म्हणाले.  

शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून दिलेल्या टीईटी घोटाळ्यात हजारो उमेदवार समाविष्ट असल्याचे पुढे आले आहे. अशांची नावेच शिक्षण विभागाने प्रकाशित केली आहे. मात्र, या यादीत आमदार अब्दुल सत्तार यांच्या तीन मुली आणि एका मुलाचे नाव यादीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. ही यादी व्हायरल झाल्याने यावर सत्तार यांनी स्वतः खुलासा केला असून हे सर्व फेक आहे. या मागे षडयंत्र आहे. याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करणार असे म्हटले आहे. दरम्यान, ही यादी बाहेर येताच सत्तारांवर चौफेर टीका होत आहे.  काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी "अब्दुल सत्तारांनाच आता शिक्षणमंत्री करतील" असं म्हणत टीईटी घोटाळ्यावरून खोचक टोला लगावला आहे. "टीईटी घोटाळ्यावर आम्ही विधानसभेत आवाज उठवू. सरकार त्यांचंच आहे. आता अब्दुल सत्तार यांनाच ते शिक्षण मंत्री करतील. मग सगळाच निकाल लागेल. राज्यात अस्थिरता असेल तर अशा गोष्टी बघता येत नाही. घोटाळे बघायला वेळ नसतो. सरकारमध्ये मंत्री कोण होणार? कुणाला कोणते खाते मिळणार? तेच लोक बघतात. त्यामुळे बाकीच्या गोष्टी लपून जातात" असं म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी निशाणा साधला आहे. 

पोटशूळ उठला असेल, सत्तारांचे प्रतिउत्तर औरंगाबादमध्ये या प्रकरणावर माध्यमांसोबत सत्तारांनी संवाद साधला. दरम्यान, पत्रकारांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या टीकेवर सत्तारांना प्रश्न विचारला. यावर सत्तार यांनी संताप व्यक्त केला आहे. चव्हाण यांचा पोटशूळ असेल. त्यांच्या मनामध्ये काय असेल, ते महाविकास आघीडीचे सरकार असतानाही दिसत होते. आता तो गोळा बाहेर आला असेल. यावर आता जास्त बोलयाचे नाही, असे सत्तार म्हणाले. दरम्यान, मंत्रीमंडळ विस्ताराआधी माझी बदनामी करणाऱ्यांकडे पाहतो, कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा सत्तारांनी दिला. 

टॅग्स :Abdul Sattarअब्दुल सत्तारAurangabadऔरंगाबादPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणShiv Senaशिवसेना