शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचा निवृत्त होतोय कणा; दरवर्षी तब्बल दीडशे कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती

By मुजीब देवणीकर | Updated: October 14, 2023 18:30 IST

महापालिकेत १९८८-९० पर्यंत मोठ्या प्रमाणात भरती झाली; पण नंतर मनपाने मोठी भरती प्रक्रियाच राबविली नाही.

छत्रपती संभाजीनगर : महापालिकेच्या कारभाराचा कणा म्हणून ओळख असलेले वर्ग- ३ आणि ४ मधील कर्मचारी मागील काही वर्षांपासून मोठ्या संख्येने सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे कामकाजावर मोठा परिणाम होतोय. पूर्वी सफाई कर्मचारी निवृत्त झाल्यावर लाड-पागे समितीनुसार त्यांच्या पाल्यांना सेवेत घेतले जात होते. खंडपीठाच्या स्थगितीमुळे मार्च महिन्यापासून ही प्रक्रियाही थांबली आहे. लाड-पागे समितीसमोर अर्जांचा ढीग लागला आहे.

महापालिकेत १९८८-९० पर्यंत मोठ्या प्रमाणात भरती झाली; पण नंतर मनपाने मोठी भरती प्रक्रियाच राबविली नाही. त्यामुळे अधिकारी, कर्मचारी निवृत्त होण्याचे प्रमाण पाच ते सात वर्षांमध्ये झपाट्याने वाढले. दरवर्षी सुमारे १०० ते १५० अधिकारी, कर्मचारी निवृत्त होतात. यामुळे कनिष्ठ अभियंते, लिपिकांना प्रभारी म्हणून अनेक मोठी पदे देण्याची वेळ प्रशासनावर ओढवली. शासनाने दोन वर्षांपूर्वी महापालिकेला कर्मचारी भरतीची परवानगी दिली. ११४ पदे पहिल्या टप्प्यात भरण्यात येणार आहेत. त्यासाठी अर्जही मागविले. ९ हजारांहून अधिक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज केले; परंतु खासगी कंपनी परीक्षा कधी घेणार, हे प्रशासनाला सांगायला तयार नाही. शहरातील १८ लाख नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा देण्यासाठी अधिकारी, कर्मचारी लागतात. त्यामुळे महापालिकेने २०१४ पासून कंत्राटी धोरण स्वीकारले. १२०० पेक्षा अधिक कंत्राटी कर्मचारी मनपात आहेत. बचतगटांमार्फत घेतलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या वेगळीच आहे.

यंदा १५७ जण होणार निवृत्तजानेवारी ते डिसेंबर २०२३ मध्ये महापालिकेतील वर्ग १ मधील ८ अधिकारी निवृत्त होत आहेत. वर्ग-२ मध्ये १ जण, वर्ग- ३ मधील ४४ आणि वर्ग-४ मध्ये सर्वाधिक १०४ कर्मचारी निवृत्त होतील. निवृत्तांचा एकूण आकडा १५७ आहे. त्यातील काही अधिकाऱ्यांना निवृत्तीनंतरही सहा महिन्यांची मुदतवाढ दिली. त्यांना दिलेले प्रशासकीय, आर्थिक अधिकार हा विषय गंभीर बनतोय.

सफाई कर्मचाऱ्यांचा तुटवडाशहर लोकसंख्येच्या तुलनेत सफाई कर्मचारी दीड हजारच आहेत. त्यातही निवृत्तांची संख्या वाढतेय. त्यांच्या पाल्यांना नोकरीत घेता येत नाही. त्यामुळे मनपासमोर कंत्राटीशिवाय दुसरा पर्याय नाही.

पुढच्या महिन्यात परीक्षाभरतीसाठी खासगी कंपनीकडे वारंवार मनपा प्रशासन पाठपुरावा करीत आहे. पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा घ्यावी, असा प्रयत्न सुरू आहे.- रणजित पाटील, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका