शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण चिंताजनक; फुप्फुसाचे आरोग्य धोक्यात

By संतोष हिरेमठ | Updated: December 2, 2024 18:18 IST

जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा छत्रपती संभाजीनगरच्या हवेत ‘पार्टिक्युलेट मॅटर’चे प्रमाण अधिक, श्वसन विकाराला हातभार

छत्रपती संभाजीनगर : शहरातील हवेत पार्टिक्युलेट मॅटर अर्थात ‘पीएम’चे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढलेले आहे. विशेष म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकापेक्षा हे प्रमाण अधिक आहे. वातावरणात पार्टिक्युलेट मॅटरची पातळी वाढल्याने याचा नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होण्यास हातभार लागत आहे. या ‘पीएम’चा परिणाम फुप्फुसांवर तर होतोच; त्याबरोबरच ते डोळे आणि श्वसनमार्गाला नुकसान पोहोचवीत आहे.

दरवर्षी २ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रीय प्रदूषण प्रतिबंध दिन’ पाळला जातो. १९८४ च्या भोपाळ गॅस दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो. हा दिवस साजरा होत असतानाच छत्रपती संभाजीनगर शहराच्या हवेची गुणवत्ता संवेदनशील बनल्याचे समोर आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालात गंभीर शेरा असून, शहर राज्यात चौथ्या क्रमाकांवर आहे. फुप्फुस हा शरीरातील महत्त्वाचे अवयव असून, शुद्ध ऑक्सिजन शरीराला पोहोचवण्याचे काम करते. मात्र, बदलती जीवनशैली, प्रदूषण आणि काही हानिकारक गोष्टींमुळे फुप्फुसांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे.

‘डब्ल्यूएचओ’ सांगितलेली मर्यादा किती?शहरातील हवेत पीएम अर्थात पार्टिक्युलेट मॅटर २.५ आणि पीएम १० अशी पार्टिकलची पातळी वाढली आहे. ‘डब्ल्यूएचओ’ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनुसार २४ तासांत हवेतील पीएम २.५ आणि पीएम १० पार्टिक्युलेट मॅटर अनुक्रमे १५ आणि ४५ पेक्षा जास्त नसावेत.

शहरातील रविवारी दुपारी २ वाजण्याची स्थिती- २.५ मायक्रॉनअंतर्गत कण (पीएम २.५) : ६७.३ मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर- १० मायक्रॉनअंतर्गत कण (पीएम १०) : १०७.० मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर- नायट्रोजन ऑक्साइड : १७.२ मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर- सल्फरडाय ऑक्साइड : १८.२ मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर- कार्बन मोनोक्साइड : ८००. ० मायक्रो ग्रॅम्स पर क्युबिक मीटर

काय आहे पीएम २.५ आणि पीएम १०?पीएम २.५ आणि पीएम १० हे कण अनुक्रमे २.५ आणि १० मायक्रॉन व्यासाचे असतात, जे हवेत असतात. हे इतके लहान आहेत की ते श्वसनमार्गाद्वारे फुप्फुसापर्यंत पोहोचतात. पीएम २.५ फुप्फुसाच्या आतील थरापर्यंत पोहोचतो. पीएम १० फुप्फुसाच्या वरच्या भागावर परिणाम करतो. पीएम २.५ आणि पीएम १० हे वेगवेगळ्या उत्सर्जन स्रोतांपासून बाहेर पडतात. यांची रासायनिक संरचनाही वेगळी असते. पीएम २.५ हे पार्टिकिल्स गॅसोलीन, तेल, डिझेल इंधन किंवा लाकूड जाळल्यानंतर निघणारा धूर यांतून तयार होते; तर बांधकामाच्या ठिकाणी असलेली धूळ किंवा कचरा, औद्योगिक ठिकाणे आणि हवेतील धूळ, परागकण यांपासून पीएम १० पार्टिकल तयार होतात.

फुप्फुसासाठी हे हानिकारक...- फुप्फुसाच्या कर्करोगासाठी धूम्रपान हे सर्वांत मोठे कारण मानले जाते.- सिगारेटमधील रसायने : तंबाखूमध्ये निकोटिन आणि ७० हून अधिक कर्करोगजन्य रसायने असतात.- धूम्रपानापाठोपाठ हवेतील सूक्ष्म कण फुप्फुसात जमा होऊन कर्करोग होऊ शकतो.- चूल किंवा लाकडे जाळल्याने होणारा धूरही फुप्फुसांना हानी पोहोचवतो.- औद्योगिक क्षेत्रातून बाहेर पडणारी बेंझिन, निकेल आणि क्रोमियम यांसारखी रसायने फुप्फुसांचे नुकसान करतात.

ही घ्या काळजी...- वायुप्रदूषणापासून बचावासाठी मास्कचा वापर करा.- रासायनिक आणि औद्योगिक संपर्क टाळण्याचा प्रयत्न करा.- घर आणि आजूबाजूचा परिसर प्रदूषणापासून सुरक्षित ठेवा.- शारीरिक तंदुरुस्ती कायम ठेवा आणि पोषणयुक्त आहार घ्या.- नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्या, विशेषतः धोक्याच्या क्षेत्रात राहत असल्यास.

तीव्रता वाढीस हातभारएखाद्या व्यक्तीला श्वसनविकार असेल तर प्रदूषित वातावरणाने त्या विकाराची तीव्रता वाढण्यास हातभार लागतो. धुलिकण आरोग्यासाठी अपायकारक आहेत. घाटीतील श्वसनशास्त्र विभागातील ओपीडीत दररोज साधारण ६० रुग्ण येतात.- डाॅ. अविनाश लांब, श्वसनविकारशास्त्र विभागप्रमुख, घाटी

प्रदूषणासह इतर बाबीही कारणीभूतप्रदूषण, सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन हे फुप्फुसाच्या कर्करोगाला आमंत्रण देणारे ठरते. खोकला आहे, म्हणून रुग्ण वेळीच उपचार घेण्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे तिसऱ्या, चौथ्या स्टेजला येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. कोणत्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.- डाॅ. बालाजी शेवाळकर, किरणोपचारशास्त्र विभागप्रमुख, शासकीय कर्करोग रुग्णालय

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरpollutionप्रदूषण