शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक वास्तूंमुळे निओ मेट्रोची अलाईनमेंट बदलली

By मुजीब देवणीकर | Updated: July 18, 2023 18:38 IST

प्रकल्प आराखड्यात बदल करावा लागणार

छत्रपती संभाजीनगर : जालना रोडवर एकच उड्डाणपूल, त्यावर निओ मेट्रो उभारण्यासाठी काही दिवसांपासून काम सुरू आहे. निओ मेट्रो प्रकल्प उभारणीत ऐतिहासिक वास्तूंचा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे काही ठिकाणी अलाईनमेंट बदलावी लागणार आहे. प्रकल्प आराखड्यातही बदल करावा लागणार असल्याची माहिती सोमवारी निओ मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांना एका आढावा बैठकीत दिली.

स्मार्ट सिटी कार्यालयात कराड यांनी शहरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. बैठकीस जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, प्रशासक जी. श्रीकांत, महावितरणचे विभागीय सहसंचालक डॉ. मंगेश गोंदवले यांची प्रमुख उपस्थिती होती. निओ मेट्रोसह अखंड उड्डाणपुलाच्या डीपीआरचे सादरीकरण केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर अलीकडेच झाले. केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाची धावपट्टी वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विमानाचे उड्डाण आणि लँडिंग करताना अखंड उड्डाणपुलाच्या उंचीचा अडथळा येत असल्याने नव्याने डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नव्याने अखंड उड्डाणपूल करण्यासाठी विमानतळासमोर चारशे मीटर जमीन लागणार आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया राबवावी लागणार असल्यामुळे तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करून विमानतळ प्राधिकरणाचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर डीपीआर सादर करावा लागेल.

संरक्षण विभागाची जागा घेणारअखंड उड्डाणपुलासाठी संरक्षण विभागाने जागा देण्यास नकार दिल्यामुळे ४ किमीपर्यंत जमिनीलगत काम करावे लागणार असल्याने त्याचा विचार करूनच डीपीआर बनविण्यात आला होता. संरक्षण मंत्रालयाची जागा घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल. त्यासाठी नव्याने डीपीआर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

मेट्रोच्या अलाईनमेंटमध्ये बदलनिओ मेट्रोच्या टप्पा-२च्या अलाईनमेंटमध्ये बदल करण्यात आला आहे. केंद्रीय पुरातत्व विभागाने दिल्लीगेट येथून निओ मेट्रोला जाण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र दिले नाही. त्यामुळे निओ मेट्रोच्या अलाईनमेंटमध्ये बदल करण्यात आला असून चांदणे चौक, सलीम अली सरोवर, टीव्ही सेंटर, हडको कॉर्नर, हडको टी-पॉइंट, जळगाव रोड, मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन असा मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे प्रकल्पाची किंमत वाढणार असून, लवकरात लवकर डीपीआर तयार करून सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका