शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकारी बदलतील, ठाणेदाराचा मोबाईल नंबर असेल 'तोच'; छत्रपती संभाजीनगरात पोलिसांचा मोठा निर्णय

By बापू सोळुंके | Updated: May 27, 2023 19:58 IST

छत्रपती संभाजीनगरात पोलीस आयुक्तांचा स्तूत्य निर्णय; 'वन युनीट, वन ऑफिसर वन मोबाइल' योजनेंतर्गत सर्व ठाणेदारांना कायमस्वरूपी मोबाइल क्रमांक देण्यात आले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: शासकीय नियमानुसार पोलीस ठाणे प्रमुखांच्या बदल्या होतील, ते दुसरीकडे रूजू होतील पण पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराचा मोबाइल नंबर मात्र बदलणार नाही. कारण पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांच्या संकल्पनेनुसार 'वन युनीट, वन ऑफिसर वन मोबाइल' या योजनेंतर्गत सर्व ठाणेदारांना कायमस्वरूपी मोबाइल क्रमांक देण्यात आले आहे.एका अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर ठाणेदार म्हणून ते वापरत असलेला मोबाइलक्रमांक नव्या ठाणेदाराकडे देऊन जातील.

या योजनेविषयी अधिक माहिती देताना शहराचे पाेलीस आयुक्त मनोज लोहिया म्हणाले की,  सामान्य जनता आणि पोलीस अधिकारी यांच्यात कायम सुसंवाद असावा, संकट समयी सहज पोलीस अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर संपर्क करता यावा, यासाठी वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल ही संकल्पना पुढे आली आहे. विद्यमान ठाणेदाराचा मोबाइल क्रमांक नागरीकांकडे असतो. कालांतराने एखाद्या संकटसमयी नागरीक जेव्हा त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधतात, तेव्हा त्या अधिकाऱ्याचा मोबाइल लागत नाही अथवा त्या अधिकाऱ्याची दुसरीकडे बदली झाल्याचे त्यांना समजते. नव्या अधिकाऱ्यााच मोबाइल माहिती नसल्याने  वेळेत संपर्क होऊ न शकल्यास संकटसमयी तातडीने  मदत मिळत नाही. 

यापुढे असे होऊ नये, यासाठी वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल संकल्पना आहे. बदलीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी नव्या ठाणेदाराकडे चार्ज देताना तो त्यांचा मोबाइल सीम देईल. यामुळे  ठाणेदाराचा मोबाईल क्रमांक कायम असेल. अशाप्रकारे वन युनिट, वन ऑफिसर, वन मोबाइल वापरणारे राज्यातील पहिले पोलीस आयुक्तालय ठरणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी नमूद केले.  १ जूनपासून शहर पोलीस दलात राबविण्यात येत आहे. या पत्रकार परिषदेला प्रातिनिधीक स्वरुपात पोलीस निरीक्षक गीता बागवडे आणि पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांना अधिकाऱ्यांच्या नवीन नंबरचे फलक पोलीस आयुक्तांनी दिले. यापत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त दीपक गिऱ्हे, उपायुक्त शिलवंत नांदेडकर आणि गुन्हेशाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांची उपस्थिती होती.

संवेदनशील ठिकाणी असेल २४ तास राहुटीशहरातील अतिसंवेदनशील आणि संवेदनशील कॉलनी, चौकात आता कायमस्वरुपी सशस्त्र पोलिसांची राहुटी असेल. यासोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यात दंगा काबू पथकाला आवश्यक शस्त्र आणि साहित्य ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष करण्यात येणार आहे. जेणेकरून ऐनवेळी ही साहित्य घेऊन पोलीस घटनास्थळी तात्काळ पेाहचतील. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस