शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे धास्तावले, त्यांचा आत्मविश्वास ढळला; केंद्रीयमंत्री प्रताप जाधवांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 16:55 IST

सकाळी ९ वाजता वाजणाऱ्या भोंग्याला लोक कंटाळले असून, ठाकरे व राऊत यांनीही कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारावी.

छत्रपती संभाजीनगर : खऱ्या, खोट्या मोजमापाचा कुंभमेळा विधानसभा निवडणुकीतच झाला आहे. खरी शिवसेना कोणती, याचे उत्तर जनतेने दिले आहे, असा टोला केंद्रीय आयुष खात्याचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत लगावला.

केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी, महाराष्ट्राला मिळालेल्या योजनांची उजळणी केल्यानंतर त्यांनी पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुंभमेळ्याला जाणार आहेत, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली. यावर जाधव यांनी राऊत यांना टोला लगावला. सकाळी ९ वाजता वाजणाऱ्या भोंग्याला लोक कंटाळले असून, ठाकरे व राऊत यांनीही कुंभमेळ्यात जाऊन डुबकी मारावी. ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे धास्तावले असून, त्यांचा आत्मविश्वास ढळल्याचे ते म्हणाले. शिंदेसेनेच्या आमदारांची सुरक्षा काढल्याप्रकरणी ते म्हणाले, सुरक्षा आम्ही मागितली नव्हती, मात्र कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुरक्षा दिली होती. यावेळी भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, जालिंदर शेंडगे, दीपक ढाकणे आदींची उपस्थिती होती.

कॅन्सर लस अंतिम टप्प्यात....कॅन्सर लस अंतिम टप्प्यात असून, चाचणी सुरू आहे. ९ ते १६ वयांतील मुलींना भविष्यातील कॅन्सरपासून सुरक्षा मिळावी, यासाठी ती लस असेल. लसीचे नाव जाधव यांनी सांगितले नाही. जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू करणार असल्याचेही ते म्हणाले. आयुष मंत्रालयाच्या विविध योजनांंची त्यांनी माहिती दिली.

मंत्री शिंदेसेनेचे अन् गर्दी भाजपची ..जाधव हे शिंदेच्या कोट्यातून केंद्रातमंत्री आहेत. परंतु पत्रपरिषदेला शिंदेसेनेचे कुणीही नव्हते. फक्त भाजपचेच पदाधिकारी होते. मंत्री जाधव रवाना झाल्यानंतर शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ आले. दुपारी २ वाजेची वेळ दिली होती. त्यामुळे मी आता आलो, असे जंजाळ म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना