शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

टेस्टिंग वाढवताच रुग्णसंख्या झपाट्याने कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 4:04 AM

औरंगाबाद : मार्च महिन्यात औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोठ्या ...

औरंगाबाद : मार्च महिन्यात औरंगाबाद शहरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत होती. महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी मोठ्या प्रमाणात तपासण्या सुरू केल्या. गुरुवारी जवळपास सहा हजार तपासण्या केल्यानंतर शुक्रवारी ६३८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. शहरासाठी ही दिलासादायक बाब आहे.

औरंगाबाद शहर आणि ग्रामीणमधील रुग्णसंख्या दररोज जवळपास दोन हजारांपर्यंत जात होती. रुग्णसंख्येला ब्रेक लावण्यासाठी महापालिका प्रशासक यांनी दररोज १० हजार नागरिकांची तपासणी करण्याचे आदेश दिले. महापालिकेकडे मनुष्यबळ कमी असल्यामुळे दररोज ५ ते ६ हजार नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. गुरुवारी ५ हजार ८६२ संशयित रुग्णांची तपासणी केली असता शुक्रवारी ६३८ जण पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आले. पॉझिटिव्ह येणाऱ्या नागरिकांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. शहरासाठी ही अत्यंत समाधानकारक बाब आहे. महापालिका प्रशासनाने मागील काही दिवसांपासून मेगा लसीकरण मोहीमसुद्धा सुरू केली आहे. या मोहिमेला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सध्या शहरात लॉकडाऊन लावण्यात आला आहे. संसर्ग कमी होण्यासाठी हेसुद्धा एक कारण असण्याची शक्यता आहे. शहरात सध्या ८ हजार ४०३ सक्रिय रुग्ण आहेत. शहरातील रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी मराठवाडा, जळगाव, बुलडाणा, वाशीम, अहमदनगर, नाशिक येथून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत आहेत. त्यामुळे आरोग्य सेवा कोलमडून पडत आहे. शहरात आणखी सीसीसी सेंटर, डीसीएचसी बेड, ऑक्सिजन बेड, ऑक्सिजन केंद्रे वाढविण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. महापालिका शहरात १० सीसीसी केंद्रांवर ऑक्सिजनची व्यवस्था करणार आहे. १ हजार बेडवर ही व्यवस्था राहणार आहे. विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्याकडे शासनाने काही जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा आणखी बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे मनपा प्रशासनाने कळविले आहे.

शहरात झपाट्याने कमी होत असलेली रुग्णसंख्या

एप्रिल - रुग्णसंख्या

१० - १,०८७

११ - ७२०

१२ - ७७७

१३ - ८१३

१४ - ७७१

१५ - ७६७

१६ - ६३८