शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बीड बायपासवर भीषण अपघात: ट्रकमधील सळ्या केबिनमध्ये घुसल्या, एकाचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:57 IST

ब्लिंकिंग लाइट, रेडियम पट्ट्या नसल्याने रस्ता मृत्यूचा सापळा; बीड बायपासवर ११ महिन्यांत पाचवा बळी

छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून लोखंडी सळ्या घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेला सुसाट ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यात चालक आकाश अशोक राठोड (वय २८) हा सुखरूप बचावला. मात्र त्याचा सहकारी लक्ष्मण बाळासाहेब धोत्रे (४३, दोघे रा. वाघेश्वरनगर, वाघोली) याचा पोटात सळ्या घुसून आतडे बाहेर आल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री दोन वाजता बीड बायपासवर एमआयटी पूल उतरल्यानंतर राज्य वखार महामंडळासमोर हा अपघात घडला.

एकाच वसाहतीत राहणारे आकाश व लक्ष्मण सोबतच ट्रान्स्पोर्टचे काम करत होते. कंपनीच्या ऑर्डरनुसार ते बुधवारी जालन्याला लोखंडी सळ्या घेण्यासाठी गेले होते. रात्री सळ्या घेऊन त्यांनी झाल्टामार्गे शहरात प्रवेश केला. बीड बायपासमार्गे त्यांना पुण्याच्या दिशेने रवाना व्हायचे होते. एमआयटी महाविद्यालयासमोरील पूल उतरताना मात्र त्यांना समोरील दुभाजकाचा अंदाजच आला नाही. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सळ्या असल्याने व ७० ते ८० कि.मी. ताशी वेग असतानाही ट्रक पुलावरून वेगात उतरला. तो थेट दुभाजकावर जाऊन आदळला. यात मागील सर्व सळ्या समोर केबिनमध्ये घुसून केबिन जवळपास १५ ते २० फुटांपर्यंत फेकली गेली.

पोटात सळ्या घुसल्याकेबिन दूरवर फेकली जाताच धोत्रे यांच्या पोटात सळ्या घुसून आतडेच बाहेर आले. दोन्ही पाय तुटल्याने ते घटनास्थळीच मरण पावले; तर आकाश आश्चर्यकारकरीत्या बचावला. या घटनेमुळे परिसरात मोठा स्फोटासारखा आवाज झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार पृथ्वीराज चव्हाण, विष्णू जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

मार्गावर ब्लिंकिंग लाइटचा अभावबीड बायपासवरील पुलावर दुभाजक नसल्याने दोन्ही दिशांची वाहने धोकादायकरीत्या ओव्हरटेक करतात. शिवाय, रस्त्यावरील वळण, महत्त्वाचे चौक, पुलावर दुभाजक दर्शवणारे रेडियम, ब्लिंकिंग लाइट बसवण्यात आलेले नाहीत. परिणामी, चालकांना अंदाजच येत नाही. या कारणांमुळे ११ महिन्यांत पाच अपघाती मृत्यूच्या घटना घडल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Accidentअपघातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर