शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विमानतळावर टर्मिनल तयार, पण आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेची प्रतीक्षाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2022 12:27 IST

सेवा सुरू होण्यासाठी अडथळे दूर होईना; जगभरात माल पाठविण्यासाठी मुंबई, दिल्लीवर मदार

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जगभरातील अनेक कंपन्यांच्या वाहनांत औरंगाबादेतील औद्योगिक वसाहतींमधील कंपन्यांत तयार झालेला एक तरी स्पेअर पार्ट आहे. याबरोबर इतर अनेक उत्पादनांची परदेशांत निर्यात होते. मात्र ही उत्पादने परदेशांत मुंबई, दिल्ली मार्गाने पाठविण्याची वेळ ओढवत आहे. कारण चिकलठाणा अंतरराष्ट्रीय विमानतळावर अंतरराष्ट्रीय कार्गो सेवा सुरू होण्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

औरंगाबाद शहर आणि परिसरातील औद्योगिक वसाहतींमध्ये ऑटोमोबाईल्स, कृषी, फार्मासह विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कंपन्या आहेत. वर्षभरात उत्पादनांतून सुमारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. येथील उत्पादनांना जगभरातून मागणी आहे. चिकलठाणा विमानतळावरून उद्योग, शेती व्यवसायातील माल आयात-निर्यात करण्यासाठी एअर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी विमानतळावरील जुन्या टर्मिनल इमारतीचे कार्गो कॉम्प्लेक्समध्ये रुपांतर करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच विमानतळावर ड्रग इन्स्पेक्टरची नियुक्ती झाली आहे. विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे म्हणाले की, ही नियुक्ती आंतरराष्ट्रीय कार्गो सेवेसाठीच झाली आहे.

किमान एक हजार ट्रक रवानाऔरंगाबादेतील विविध उत्पादने दररोज किमान एक हजार ते १५०० ट्रकमधून देशभरातील विविध शहरांत जातात. ८० देशांमध्ये औद्योगिक मालाची निर्यात होते. यात वाहन, वाहनांचे सुटे भाग, औषधी, साॅफ्टवेअरसह इतर उत्पादनांचा समावेश आहे.

तीन हजार टन माल निर्यातचिकलठाणा विमानतळावरून सध्या मुंबईमार्गे दरवर्षी दीड हजार टन माल निर्यात केला जातो. विमानतळावर आंतराष्ट्रीय एअर कार्गो सेवा सुरू झाल्यावर दरवर्षी जवळपास तीन हजार टन माल निर्यात होईल, अशी अपेक्षा आहे.

वर्ष २०२१ मध्ये ७०६.२ टन मालाची वाहतूकऔरंगाबाद विमानतळावरून प्रवासी विमानातून सध्या देशांतर्गत कार्गो माल पाठविला जात आहे. वर्ष २०२१ मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत औरंगाबादहून दिल्ली, मुंबई, हैदराबाद, बंगळुरू, अहमदाबाद, चेन्नईला तब्बल ७०६.२ टन कार्गो पाठविण्यात आल्या.

औषधी, फूड, कृषी उत्पनांची निर्यात शक्यऔषधी, फूड, भाजीपाला, फुले यांची आंतरराष्ट्रीय कार्गोद्वारे निर्यात होईल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषी उत्पनांच्या निर्यातीसाठी योजनांच्या माध्यमातून प्रयत्न केला पाहिजे. विमानांची संख्या वाढल्यानंतर कार्गो सेवा वाढीला मदत होईल.-मुकुंद कुलकर्णी, उद्योजक

औरंगाबादेतील उद्योग कंपन्या-२५००फार्म कंपनी- ६०

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळMumbaiमुंबई