शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात प्रथमच दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2020 09:20 IST

बारावीच्या पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर रोजी होणार आहेत

ठळक मुद्देदक्षता समितीत जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

औरंगाबाद : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षा चित्रीकरणासह ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत होणार आहेत. याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी दक्षता समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. राज्यातील पहिलाच प्रयोग असल्याचे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.

बारावीच्या पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर रोजी होणार असून, या कालावधीत जिल्ह्यातील १५ केंद्रांवर २ हजार ७९५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षेचे गोपनीय साहित्य व संकलनासाठी ८ परीरक्षक केंद्र स्थापन केले आहेत. विभागीय मंडळाने दिलेल्या सूचनेनुसार माध्यमिक शिक्षणाधिकारी, प्राथमिक आणि निरंतर शिक्षणाधिकाऱ्यांची भरारी पथके तैनात केली आहेत, तसेच तालुकास्तरावर गटशिक्षणाधिकाऱ्यांचे पथक कार्यरत असणार आहे. दहावीच्या पुरवणी परीक्षा २० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरदरम्यान होणार आहेत. या परीक्षेसाठी  १५ परीक्षा केंद्रे असून, २ हजार ४०२ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतही विशेष अभियान राबवीत अनेक ठिकाणी कॉपीबहाद्दरांवर कारवाई केली होती. यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून दबावही टाकण्यात आले होते. मात्र, या अभियानाला जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या सीईओंसह प्रशासनाने सहकार्य केल्यानंतर कॉपीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात यश आल्याचा दावा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी डॉ. बी.बी. चव्हाण यांनी सांगितले.

असे असणार नियम- ५० टक्के पर्यवेक्षक हे शिक्षण विभागाच्या व्यक्तिरिक्त असावेत, असे सीईओंनी सांगितले. त्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली.-  दहावी, बारावी परीक्षेचे चित्रीकरण करण्यासह ड्रोन कॅमेऱ्याचा वापर पहिल्यांदाच होणार.-  परीक्षा केंद्रांवर बैठे पथक असणार.-  कोरेानाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार.-  परीक्षा केंद्रावर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य पथक नेमणे बंधनकारक.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादexamपरीक्षाStudentविद्यार्थी