शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रामगिरी महाराजांच्या व्हिडिओवरून वैजापुरात तणावपूर्ण शांतता; छत्रपती संभाजीनगरातही पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 15:14 IST

वैजापूर शहरात ४ दिवस जमावबंदीचे आदेश; अफवांपासून दूर राहण्याचे पोलिसांचे आवाहन 

वैजापूर/छत्रपती संभाजीनगर: सरला बेटाचे महंत मठाधिपती रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमांमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मिडियात व्हायरल झाल्यानंतर वैजापूर येथे गुरुवारी रात्री तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी धार्मिक भावना दुखावल्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर जमाव माघारी फिरला. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून शहर आणि तालुक्यात तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वैजापूरमध्ये चार दिवस जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. तसेच या घटनेचे पडसाद आज दुपारी छत्रपती संभाजीनगरात देखील पाहायला मिळाले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी नाशिक येथील सिन्नरच्या पांचाळे गावामध्ये प्रवचन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराजांनी एका धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले. काही वेळातच या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने एका समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. यावरून काहींनी आक्रमक होत रात्री आठ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्तारोको आंदोलन केले. त्यामुळे वाहतूक विस्कळित झाली. महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध व्यक्त केला. 

दरम्यान, पोलीस अधिक्षक डॉ विजय कुमार राठोड, अतीरिक्त  पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, सहाय्यक पोलीस अधिक्षक महक स्वामी, पोलीस निरीक्षक  श्यामसुंदर कौठाळे यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणात वैजापूर पोलिसांनी रामगिरी महाराजांच्या विरोधात गुन्हा दाखल केला त्यानंतर जमाव शांत झाला. दरम्यान अफवांवर विश्वास ठेवू नका चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नका असं आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी नागरिकांना केले आहे.  तसेच वैजापूर शहरात उपविभागीय अधिकारी डॉ अरुण जराड यांनी चार दिवस जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत.

आज तणावपूर्ण शांतता, पोलिसांनी केले आवाहनव्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुरुवारी रात्री गंगापूर येथेही पोलिस स्टेशनसमोर पहाटे दोन वाजेपर्यंत जमाव जमला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर जमावाने माघार घेतली. दरम्यान, आज वैजापूरसह गंगापूर येथेही तणावपूर्ण शांतता आहे. नागरिकांनी शांतता राखावी त्याचबरोबर अफवा पसरवणारे, प्रक्षोभक मेसेज फॉरवर्ड करु नये. तसेच गैरसमज करणारे मेसेज फॉरवर्ड करु नये, असे आवाहन  छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण  पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांनी केले आहे. 

छत्रपती संभाजीनगरात पडसाद, महाराज मंगळवारी करणार भूमिका स्पष्टरामगिरी महाराजांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर वैजापुरात गुरुवारी रात्री आंदोलन करण्यात आले. वैजापूर शहर, तालुक्यातील खंडाळा आणि गंगापूर येथे महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करत पोलिस स्टेशनसमोर पहाटेपर्यंत आंदोलन करण्यात आले. तर आज छत्रपती संभाजीनगर शहरात आंदोलनास सुरुवात झाली. क्रांती चौक पोलिस स्टेशनसमोर काही वेळ आंदोलन केल्यानंतर जमावाने सिटी चौक पोलिस स्टेशनकडे मोर्चा वळवला. येथे मोठा जमाव जमला असून महाराजांच्या त्वरित अटकेची मागणी करत आंदोलकांकडून घोषणाबाजी करण्यात येत आहे. शहरात परिस्थिती नियंत्रणात असून पोलिसांनी बंदोबस्त वाढविला आहे. दरम्यान, वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी रामगिरी महाराज रक्षाबंधनाच्यानंतर आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद