शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

Aurangabad Violence : धुमश्चक्रीनंतर औरंगाबाद शहरात तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 10:43 IST

शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुंवारफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार, याविषयाचा निर्णय उद्या, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. तसेच दंगलीतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.

ठळक मुद्देमंत्री, नेते, अधिकारी शहरात : सोशल मीडियाने दंगल भडकवलीदंगलीची होणार उच्चस्तरीय चौकशी -गृहराज्यमंत्री

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील राजाबाजार, शहागंज, गांधीनगर, कुंवारफल्ली, संस्थान गणपती, चेलीपुरा भागात मध्यरात्री उसळलेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा गृहराज्यमंत्री (शहर) रणजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली. चौकशी समितीमध्ये कोण असणार, याविषयाचा निर्णय उद्या, रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. तसेच दंगलीतील नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली.दंगलग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पालकमंत्री डॉ. दीपक सावंत, गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि (ग्रामीण) दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना रणजित पाटील म्हणाले, एकाच वेळी चार-पाच ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडत होत्या. यामुळे पोलिसांना सर्वच ठिकाणी वेळेत पोहोचता आले नाही. घडलेल्या घटना अतिशय दुर्दैवी आहेत. यात सोशल मीडियाच्या गैरवापरामुळे दंगल भडकण्यास हातभार लागला असून, सायबर सेलला याविषयी तपास करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार दंगलीच्या सखोल चौकशीसाठी राज्यस्तरावरील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली जाणार आहे. या चौकशीतून सर्व सत्य बाहेर येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.कोणतीही दंगल असो ती वाईटच असते. त्यात जात-धर्माचा संबंध येत नाही. ही एक प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती नष्ट करण्यासाठी सर्व यंत्रणांची मदत घेऊन चौकशी केली जाईल. तसेच शिवसेना आणि एमआयएम पक्षीय वादातून ही दंगल झालेली नसल्याचा दावाही रणजित पाटील यांनी केला.चौकशीचा कालावधी नाहीउच्चस्तरीय चौकशी किती दिवसांत होणार? असा प्रश्न गृहराज्यमंत्र्यांना विचारला असता त्यांनी याविषयीचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचे सांगितले. तसेच मिटमिटा परिसरात झालेल्या दंगलीची चौकशी सुरू झालेली नाही याकडे लक्ष वेधताच त्यांनी त्या दंगलीचा आणि या दंगलीचा काहीही संबंध नसल्याचे सांगितले.

जखमी, नुकसानीविषयी मंत्री अनभिज्ञदंगलीमध्ये नुकसान किती झाले? पोलीस अधिकारी, पोलीस आणि नागरिक किती जखमी झाले? याविषयीची आकडेवारी गृहराज्यमंत्री पाटील यांना विचारली असता, त्यांना ठोस आकडा सांगता आला नाही. आपल्या विभागातील किती पोलीस जखमी झाले, याचीही माहिती पाटील यांना देता आली नाही. दोन अधिकारी आणि तीन पोलीस जखमी झाल्याचे समजले, असे उत्तर दिले. तसेच नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतरच सर्व माहिती समोर येईल, असे सांगत वेळ मारून नेली....अन् पालकमंत्र्यांचा पारा चढलाशहरात पोलीस आयुक्त नाहीत, महापालिका आयुक्त नाही. यातच पाणी प्रश्न, कचºयाचा प्रश्न गंभीर बनला आहे. पालकमंत्री असून नसल्यासारखेच आहेत, असा प्रश्न पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांना विचारला असता त्यांचा पारा एकदम चढला. पालकमंत्री असून नसल्यासारखे म्हणजे काय? पालकमंत्र्यांनी अशा घटना घडल्या त्यात काय करावे? शहरात दररोजच कच-याची निर्मिती होते.त्यामुळे ती समस्या सोडविण्यासाठी थोडासा अवधी लागणार आहे. त्याविषयीचे नियोजन केले असल्याचेही डॉ. सावंत यांनी सांगितले. घडलेली घटना दुर्दैवी आहे. समाजात सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणूनच शहरात आलो आहे. कोणत्याही समाजाला दंगली परवडत नसतात. दोन्ही बाजूकडील नागरिकांना शांतता, अमन हवी आहे. ती स्थापित होण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHome Ministryगृह मंत्रालयDeepak Kesarkarदीपक केसरकर Social Mediaसोशल मीडियाAurangabad Violenceऔरंगाबाद हिंसाचार