शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
2
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
3
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
5
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
6
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
7
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
8
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
9
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
10
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
11
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
12
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
13
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
14
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
15
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
16
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
17
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
18
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
19
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
20
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल

खाजगी बसची दहा टक्के भाडेवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 1:09 AM

खाजगी बस कंपन्यांकडून विविध मार्गांवरील बसच्या भाड्यात दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : खाजगी बस कंपन्यांकडून विविध मार्गांवरील बसच्या भाड्यात दहा टक्क्यांपर्यंत भाडेवाढ केली आहे. प्रवासी हंगामासह डिझेलचे दर वाढल्याने भाडेवाढ केल्याचे सांगितले जात आहे. उन्हाळी सुट्यांमुळे विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या प्रवाशांना भाडेवाढीची झळ सहन करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे.सुट्यांच्या कालावधीत खासगी बस, ट्रॅव्हल्स इतर कंत्राटी वाहनांचा वापर करण्यात येतो. गर्दीचा फायदा घेऊन अनेक वाहतूकदारांकडून अवास्तव दर आकारणी करण्यात येते. परंतु आता खासगी वाहनांना एस. टी. महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारणाºयांवर आरटीओ कार्यालयाकडून करडी नजर ठेवली जात आहे. अशा परिस्थितीत उन्हाळी सुट्यांचा हंगाम आणि डिझेल दर वाढल्याचे म्हणत भाडेवाढ करण्यात आली आहे. झालेली भाडेवाढ ही ‘एसटी’च्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट राहील, याची खबरदारी घेण्यात येत असल्याचा दावा ट्रॅव्हल्स असोसिएशनकडून होत आहे.औरंगाबादेतून नागपूर, मुंबई, पुणे, लातूर, सोलापूरसह विविध शहरांसाठी खाजगी बस धावतात. सोलापूरसाठी ३५० रुपये असलेले भाडे आता ४०० रुपये आकारण्यात येत आहे. तर सोलापूर स्लीपर बससाठी ५५० रुपयांवरून ६३० रुपयांपर्यंत भाडे घेण्यात येतआहे.हंगाम नसताना नागपूर स्लीपर बसचे भाडे ६३० ते ७५० रुपयांपर्यंत आकारण्यात येते. परंतु आजघडीला खाजगी बसकडून ९५० ते १०५० रुपयांपर्यंत भाडे आकारण्यात येत आहे. अशाच प्रकारे अन्य मार्गांवरील भाड्यांमध्ये ५० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत वाढ झाल्याची माहिती खाजगी बस कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून देण्यात आली.