शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांचा आरोप करण्याचा स्तर ढासळला, आम्ही त्यांना.., एकनाथ शिंदेंचं प्रियंका चतुर्वेदी आणि ठाकरे गटाला प्रत्युत्तर 
2
भाजपा आमदार सुरेश धस यांचं धमाकेदार भाषण; घरफोडीवरून शरद पवार, रोहित पवारांना सुनावलं
3
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
4
शांतिगिरी महाराजांचा सहा मतदार संघात पाठींबा कोणाला? आज भूमिका जाहीर करणार
5
'अत्यंत दळभद्री...'; नरेंद्र मोदींच्या 'त्या' विधानावरुन संतापले संजय राऊत
6
'ज्यांना दोन बायका, त्यांना काँग्रेस देणार २ लाख रुपये'; वरिष्ठांसमोरच उमेदवाराची घोषणा
7
‘माझा धाकटा भाऊ तोफ, मीच त्याला रोखून ठेवलंय, अन्यथा’, असदुद्दीन ओवेसींचा राणांना इशारा
8
Opening Bell: गुरुवारच्या मोठ्या घसरणीनंतर आज शेअर बाजारात तेजी, BPCL वधारला, पिरामलचे शेअर घसरले
9
जस्टीन बीबरचं होणार 'प्रमोशन'; लवकरच बाबा होणाऱ्या गायकाने पत्नीसोबत केलं खास मॅटर्निटी फोटोशूट
10
'लसीवर दुष्परिणाम छापले होते'; कोव्हिशिल्डबाबत सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण
11
कतारनंतर भारताचा आणखी एक राजनैतिक विजय, इराणने इस्रायलच्या मालवाहू जहाजावर असलेल्या ५ भारतीयांची केली सुटका
12
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
13
Sanjiv Goenka Net Worth: KL Rahul वर संतापलेले संजीव गोएंका कोण? माहितीये किती आहे नेटवर्थ?
14
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
15
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
16
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
17
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
18
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
19
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
20
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर

दहा महिन्यांच्या चिमुकल्याचा बाप व चुलत्याकडून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2018 12:39 AM

क्रूरतेचा कळस : मृतदेह वाळूत दाबला; दोघा नराधमांना अटक, घाटनांद्रा येथील खळबळजनक घटना

सिल्लोड : जन्मदाता बाप व काकाने अवघ्या दहा महिन्यांच्या पोटच्या मुलाचा खून करून त्याचा मृतदेह वाळूखाली दाबल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा येथे उघडकीस आली. एवढेच नव्हे, तर या चिमुकल्याच्या आईलाही या दोघा नराधमांनी बेदम मारहाण करून तिलाही संपविण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी नराधम बाप व काकाला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, बायको पसंत नसल्याच्या कारणावरून ही हत्या झाल्याचे रात्री उशिरा पोलिसांनी सांगितले.

खून झालेल्या दहा महिन्यांच्या निष्पाप मुलाचे नाव सागर संदीप मोरे असून, खून करणाऱ्या आरोपींची नावे संदीप काशीनाथ मोरे (२८) व किशोर काशीनाथ मोरे (३४, दोघे रा. घाटनांद्रा, ता. सिल्लोड), असे आहे. बेदम मारहाण करण्यात आलेल्या मृत मुलाच्या आईचे नाव कविता संदीप मोरे (२२) असे आहे. दोघा आरोपींना न्यायालयाने नऊ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सिल्लोड तालुक्यातील देऊळगाव बाजार येथील कविताचे लग्न तीन वर्षांपूर्वी घाटनांद्रा येथील संदीप काशीनाथ मोरे याच्याशी झाले होते. काही दिवस संसार सुखात चालला. एका महिन्यापूर्वी दोघांत घरगुती कारणावरून वाद झाल्याने कविताच्या सास-याने तिला तिच्या माहेरी आणून सोडले होते; मात्र त्यानंतर आठ दिवसातच कविताच्या सासरची मंडळी व घरच्यांची समजूत काढून कविताला पुन्हा सासरी नेले.

हरवल्याची दिली तक्रार३१ मार्च रोजी कविता व तिचा दहा महिन्यांचा मुलगा सागर घाटनांद्रा येथून बेपत्ता झाल्याची तक्रार बाबूराव पाटीलबा मोरे (रा. घाटनांद्रा) यांनी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने पोलिसांनी कविता व सागरचा शोध सुरू केला होता. शोध सुरू असताना घाटनांद्र्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हरणबर्डी ओढ्याजवळ काही लोकांना कविता जखमी अवस्थेत दिसली. त्यांनी तिच्या माहेरच्या मंडळींना फोनवर माहिती दिली. नातेवाईकांनी तातडीने धाव घेऊन कविताला सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोमवारी दुपारपर्यंत तिच्यावर उपचार सुरू होते.

माझ्या तान्हुल्याचा त्याच्या बापाने व काकाने खून केल्याची माहिती कविताने तिचे मामा अशोक आमटे यांना दिली. कविताच्या मामाने सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात सागरचा खून झाल्याची तक्रार दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिराजदार, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप सावळे, सरिता गाढे, हवालदार विष्णू पल्हाड, विलास सोनवणे, विठ्ठल डोके, दादाराव पवार करीत आहेत.आईच्या डोळ्यादेखत घोटला गळा, तिने झाडावर बसून काढली रात्रया नराधमांनी माय-लेकाला शेतात कोंडून ठेवले होते व ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना देऊन दिशाभूल केली. रविवारी रात्रभर संदीपने पत्नीला व मुलाला बेदम मारहाण केली. कविताने कशी तरी या नराधमांच्या तावडीतून सुटका केली व ओढ्याजवळील झाडावर जाऊन बसली. रविवारी पहाटे या दोघांनी झाडाखाली सागरचा गळा घोटला. हे दृश्य कविता पाहत होती; परंतु आरडाओरड केली तर मलाही ते मारून टाकतील, म्हणून गुपचूप बसली. प्रकरण अंगलट येईल म्हणून या दोघांनी गावापासून १ कि.मी. अंतरावरील ओढ्यातील वाळूच्या ढिगा-याखाली सागरचा मृतदेह लपवून ठेवला. रविवारी दुपारी कविता शेतात लपल्याची माहिती या नराधमांना मिळाली. त्यांनी दोन जणांना तेथे पाठवून कविताला विहिरीत ढकलून संपविण्याचा प्रयत्न केला; पण वेळीच कविताचे नातेवाईक व गावकरी धावून आल्याने तिचा जीव वाचला.

पसंत नव्हती म्हणून...मी त्यांना पसंत नव्हती म्हणून ते मला नेहमी मारहाण करीत होते. मला व मुलाला संपविण्याची भाषा करीत होते, अशी माहिती कविताने सोमवारी रात्री पोलिसांना दिली. पोलिसांनी सोमवारी मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबादला पाठविला आहे.