शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

‘दहा फूट मागे मागे’; महापालिकेची अतिक्रमणाविरोधात नाविन्यपूर्ण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 19:17 IST

मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांची संकल्पना

ठळक मुद्देस्वत:हून अतिक्रमणे दहा फूट मागे न घेतल्यास जेसीबी चालणार‘जिथे झाड तिथे पाऊस’ ही संकल्पना घेऊन महापालिका काम करणार आहे.

औरंगाबाद : शहराला अतिक्रमणाने विळखा घातला आहे. जिथे जागा दिसेल तेथे अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. अतिक्रमणे हटविण्यासाठी ‘दहा फूट मागे मागे’ ही नावीन्यपूर्ण योजना शहरात लवकरच राबविण्यात येणार आहे. अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ नये म्हणून वृक्षारोपण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली.

भविष्यात येणाऱ्या पिढीला शुद्ध हवा, शुद्ध पाणी देणे हे आपले कर्तव्य आहे. ‘जिथे झाड तिथे पाऊस’ ही संकल्पना घेऊन महापालिका काम करणार आहे. झाडे वाढविली पाहिजेत. मोठ्या प्रमाणात आॅक्सिजन हब तयार करावे लागणार आहेत. या कामासाठी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीही होकार दर्शविला आहे. झाड लावायचे तरी कोठे, असा प्रश्न सध्या निर्माण होतो. जिथे तिथे अतिक्रमणे झाली आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणेच अतिक्रमणे आहेत. आमखास मैैदानावर अतिक्रमणे काढून यशस्वीपणे वृक्षारोप करण्यात आले. दिल्लीगेटवर अतिक्रमणे काढून वृक्षारोप केले. शहरात ठिकठिकाणी अशा पद्धतीने मोहीम राबविण्यात येईल. त्यापूर्वी अतिक्रमण केलेल्यांना स्वत:हून अतिक्रमणे काढून घ्या, अशी विनंती मनपाकडून करण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त पाण्डेय यांनी सांगितले. ‘१० फूट मागे मागे’ या योजनेत स्वत:हून अतिक्रमणे दहा फूट मागे न घेतल्यास महापालिकेचा जेसीबी पुढील काम करणार आहे.

शौचालयांची संख्या वाढविणारशहराची एक मोठी समस्या म्हणजे शैचालयांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ही संख्या वाढविण्यासाठी मनपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. काही मॉडेल शौचालये लवकरच सुरू केले जातील. नागरिकांचा प्रतिसाद चांगला मिळाल्यास त्याची संख्या अधिक वाढविली जाणार आहे. शौचालये नसल्याने महिलांना बराच त्रास सहन करावा लागत आहे.

सरोवर परिसरात चांगले लोक आले पाहिजेतसलीम अली सरोवरात पक्षी आलेच पाहिजेत. पक्ष्यांसाठी हे नंदनवन आहे. सरोवराचा वाद न्यायप्रविष्ट आहे. येथे सर्वसामान्य चांगले नागरिक जोपर्यंत जाणार नाहीत, तोपर्यंत नकारात्मक मानसिकता ठेवणाऱ्यांचा वावर तेथे वाढेल, असेही पाण्डेय यांनी नमूद केले.

‘लोकमत’चा पाठपुरावाशहरातील प्रमुख रस्त्यांवर चालण्यासाठीही जागा मिळत नसल्याबद्दल ‘लोकमत’ने वृत्त मालिका प्रकाशित केली होती. या वृत्त मालिकेची दखल खंडपीठाने घेतली होती. खंडपीठाने सुमोटो याचिका दाखल करून घेतली आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. सर्वसामान्य नागरिकांना पायीसुद्धा चालणे मुश्कील झाले आहे.४ ‘लोकमत’च्या वृत्त मालिकेनंतर महापौर नंदकुमार घोडेले यांच्या अध्यक्षतेखाली बैठकही घेण्यात आली होती. बैठकीस पोलीस उपायुक्त मीना मकवाना, पोलीस निरीक्षक दादासाहेब शिनगारे उपस्थित होते. मनपाने यासंदर्भात अ‍ॅक्शन प्लॅन तयार करण्याचे आश्वासन दिले होते. आजपर्यंत असा कोणताही अ‍ॅक्शन प्लॅन मनपाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी तयार केला नाही. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाEnchroachmentअतिक्रमण