शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगत औरंगाबादमध्ये युवकाकडून उकळली खंडणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 16:48 IST

मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस सोबत असल्याचे सांगून एका तरूणाचे अपहरण करून  त्याच्याकडून ९८ हजार रुपये खंडणी उकळण्यात आल्याची खळबळजनक घटना १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते अदालत रोड दरम्यान घडली.

औरंगाबाद:  मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस सोबत असल्याचे सांगून एका तरूणाचे अपहरण करून  त्याच्याकडून ९८ हजार रुपये खंडणी उकळण्यात आल्याची खळबळजनक घटना १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ते अदालत रोड दरम्यान घडली. याप्रकरणी सिटीचौक पोलिसांनी एका संशयितास अटक केली. 

शेख मुश्ताक शेख मुनाफ(रा.रशीदपुरा,)असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, तक्रारदार मोहमंद अश्फाक मोहंमद सिद्दीकी (२७,रा.शहाबाजार)हा फळविक्रीचा व्यवसाय करतो. १५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे तो कामानिमित्त गेला होता. तेथे त्याला आरोपी मुश्ताक भेटला आणि तो त्याच्या गळ्यात हात घालून एका कारकडे घेऊन गेला. कार जवळ जाताच आरोपीने मोहंमदला बळजबरीने कारमध्ये बसविले. 

यावेळी गाडीत कारचालक आणि अन्य दोन जण आधीच बसलेले होते. आरोपींने त्यास नारेगावला घेऊन गेले. तेथून जिन्सी आणि नंतर अदालत रोडवर नेले. यावेळी त्याने कारमध्ये बसलेले अन्य तीन जण मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस आहेत. तू माझ्याविरोधात पोलिसांत जबाब नोंदविल्याने शिक्षा म्हणून दोन लाखाची खंडणी त्यांनी मागितली. पैसे दिले नाही तर मुंबईला घेऊन जाऊ असे धमकावले. यावेळी घाबरून गेलेल्या तक्रारदार यांनी त्याच्या खिशात व्यवसायाचे असलेले ६८ हजार रुपये आरोपींना दिले.

यानंतर त्यांनी तक्रारदारास त्याच्या भावाला फोन करायला लावून ३० हजार रुपये घेऊन निरालाबाजार येथे येण्याचे सांगितले. यावर तक्रारदाराच्या भावाने एटीएम मधून ३० हजार रुपये काढले आणि ते आरोपींना दिले. पैसे मिळताच आरोपींनी तरूणाची सुटका केली. सुटका होताच दोघे भाऊ घरी गेले. त्यांनी या घटनेची माहिती घरी सांगताच त्यांच्या आईची प्रकृती बिघडल्याने त्यांना पोलिसांत तक्रार करण्यास उशीर झाला. १७ डिसेंबर रोजी सिटीचौक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सतीश पंडित यांनी आरोपी मुश्ताकला अटक केली.