शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

काय सांगता, पोलिसांनी पकडल्या गुंगीच्या गोळ्या; ‘बटन’ पुरवणारे पाचजण ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 13:35 IST

‘एनडीपीएस’ पथक आणि गुन्हे शाखेची बेगमपुरा, वाळुज भागात कारवाई

औरंगाबाद : शहरातील अमली पदार्थांचा अंमल कमी करण्यासाठी शहर पोलिसांनी गुंगीकारक गोळ्यांच्या (बटन) अवैध विक्रीचा ‘खटका’ दाबण्यास सुरुवात केली. ‘एनडीपीएस’ सेलसह गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईचा बडगा उगारत गुंगीकारक १३३३ गोळ्यांचा अवैध साठा पकडला. या कारवाईत पाच आरोपींना बेड्या ठोकल्याची माहिती निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.

‘एनडीपीएस’ सेलचे सहायक निरीक्षक सय्यद मोसीन यांना गुंगीकारक गोळ्यांच्या विक्रीसाठी काहीजण आमखास मैदानात येणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीनुसार मध्यरात्री १२.२० वाजता त्यांच्या पथकाने आमखास मैदानावर छापा मारला. तेव्हा महेंद्र ऊर्फ पेंडी गौतम काळे (वय २२, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल), सोहेल खान खलील खान (२४, रा. असेफिया कॉलनी), सद्दाम मुराद शेख (२७) आणि निखिल संजय चौतमल (१९, दोघे रा. जलाल कॉलनी) हे गोलाकार बसलेले होते. त्यांना पथकाने पकडल्यानंतर त्यांच्याकडे १३३ गोळ्या, फायटर, चिलम, दोन दुचाकी आणि तीन मोबाईल असा एकूण १ लाख ६५ हजार ८८४ रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. यातील दोन आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्यांच्याकडे गोळ्या बाळगण्याचा कोणताही परवाना आढळून आला नाही. सहायक उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे यांच्या तक्रारीवरून चौघांच्या विरोधात बेगमपुरा ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा नोंदवला. दुसरी कारवाई वाळुज भागातील जोगेश्ववाडी येथे गुन्हे शाखेच्या पथकाने केली. उपनिरीक्षक अमोल म्हस्के यांना जोगेश्वरवाडी परिसरात आरोपी गौतम लक्ष्मण त्रिभुवन (वय ३०, रा. जोगेश्वरी झोपडपट्टी) हा गोळ्या घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. गौतम हा रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास दुचाकीवर आला. तेव्हा त्यास पकडून जवळील बॅगची तपासणी केली असता, त्यामध्ये ८ गोळ्याच्या १२० स्ट्रीप आणि २४ गोळ्यांच्या १० ट्रीप्स मिळाल्या. त्याच्याकडून गोळ्यासह दुचाकी, मोबाईल असा एकूण १ लाख २ हजार ७६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी एम. वाळुज ठाण्यात गुन्हा नाेंदविला आहे. पहिली कारवाई निरीक्षक आघाव यांच्या मार्गदर्शनात एपीआय सय्यद मोसीन, नंदकुमार भंडारे, सय्यद शकील, प्रकाश गायकवाड, आनंद वाहुळ, धर्मराज गायकवाड, प्राजक्ता वाघमारे आणि डी. एस. दुभळकर यांच्या पथकाने केली. दुसरी कारवाई एपीआयचे काशीनाथ महाडुंळे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, अजित दगडखैर, औषध निरीक्षक अंजली मिटकर, सतीश जाधव, रमेश गायकवाड, संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, भगवान शिलोटे, विशाल पाटील, विलास मुठे, रवींद्र खरात, नितीन देशमुख यांच्या पथकाने केली.

आरोपीने दिवसभरात खाल्ल्या ८० गोळ्यावाळुज भागात पकडलेला आरोपी गौतम त्रिभुवनला गुंगीकारक गोळ्या खाण्याची सवय आहे. त्याने गुरुवारी दिवसभरात ८ गोळ्यांच्या एकूण १० स्ट्रीप्स खाल्ल्याची माहिती चौकशीत समोर आली. पोलिसांनी पकडल्यानंतर त्याने जेवणापेक्षा गोळ्याच हव्या असल्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र, पोलिसांनी गोळ्या दिल्या नाहीत. त्यामुळे त्याचा चेहरा पांढरा पडल्याची माहिती पोलिसांनी दिली. गौतम याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून, तो जामिनावर बाहेर आलेला आहे. कारागृहातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा गोळ्या विक्रीचा धंदा सुरू केला होता. खुनासह इतरही गुन्हे गौतमवर दाखल आहेत.

६०० ची स्ट्रीप १२०० रुपयांनाआमखास मैदानावर पकडलेल्या चार आरोपींपैकी महेंद्र ऊर्फ पेंडी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो चेलीपुरा भागातून ६०० रुपयांना गोळ्यांची एक स्ट्रीप विकत घेत होता. तीच स्ट्रीप आमखास मैदानावर नशेखोरांना १२०० रुपयांना विक्री करायचा. इतर पकडलेले तीनजण नशा करण्यासाठीच मैदानावर आले होते.

जळगाव, मालेगावहून गोळ्यांचा पुरवठागुंगीकारक औषधी गोळ्या डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाहीत. वाळुजमध्ये पकडलेल्या आरोपीने जळगावहून गोळ्या आणल्याची माहिती समोर आली आहे, तर चेलीपुऱ्यात मिळणाऱ्या गोळ्या मालेगावहून येत असल्याचे समोर येत आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारी