शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

खरं काय ते सांगा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2018 00:11 IST

शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले.

ठळक मुद्देप्रधान सचिव : कचराकोंडीविषयी औरंगाबाद मनपा अधिकाऱ्यांना प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-याच्या विल्हेवाटीसाठी काय नियोजन केले ते खरे सांगा? यासाठी कालबद्ध कार्यक्र्रम राबवा. तसेच रस्त्यावर कचरा फेकणाºयांवर, कचरा प्रक्रियेत अडथळा आणणा-यांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या यंत्रणेला प्रधान सचिव नितीन करीर यांनी गुरुवारी दिले. १६ फेबु्रवारीपासून शहरातील कचरा समस्येवर आजपर्यंत सचिव पातळीवर पाच बैठका झाल्या असून, कालबद्ध कार्यक्रम पालिकेला तयार करता आलेला नाही.नगरविकास खात्याचे प्रधान सचिव करीर यांनी गुरुवारी विभागीय आयुक्तालयात तासभर कच-याच्या समस्येबाबत पालिकेने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. शिवाय यंत्रणेची उलटतपासणीदेखील केली. त्यांनी केलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना मनपा प्रशासनाच्या अधिकाºयांची भंबेरी उडाली. १०० टक्के कचºयाचे वर्गीकरण करण्यासाठी शुक्रवारपासून सुरुवात करण्याचा शब्द घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रधान सचिवांना दिला. ७६ दिवसांपासून कचºयाची समस्या धुमसत असून, १४८ दिवसांचा कालबद्ध कार्यक्रम नारेगाव-मांडकीतील आंदोलन सुरू असताना मनपाने सादर केला होता.रस्त्यांवर कचरा दिसत नसला तरी ओला-सुका असे वर्गीकरण होत नाही. रस्त्यावर कचरा टाकणाºयांवर दंडात्मक कारवाई करा. सरकारी कार्यालयात डस्टबिन ठेवा. फळ विक्रेते, टपरीधारकांना डस्टबिन ठेवण्याची सक्ती करा. कचरा प्रक्र्रियेत अडथळा निर्माण करणाºयांवर कारवाई करण्याच्या सूचना बैठकीत पुढे आल्या.बैठकीस विभागीय आयुक्त डॉ.पुरुषोत्तम भापकर, प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, अप्पर आयुक्त शिवानंद टाकसाळे, उपायुक्त वर्षा ठाकूर, उपसंचालक रिता मेत्रेवार, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, शहर अभियंता एस. डी. पानझडे, कार्यकारी अभियंता हेमंत कोल्हे आदी अधिकारी उपस्थित होते.प्रधान सचिवांनी केलेल्या सूचनाआठ दिवसांत वॉर्ड अधिकारी, कचरा वेचकांच्या माध्यमातून मनपाने घरोघरी जावे. ओला कचरा दरदिवशी गोळा करण्यात येईल. मात्र सुका कचरा आठवड्यातील ठराविक दिवशीच गोळा करण्यात येईल, याची सूचना नागरिकांना द्यावी. खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, रसवंती, व्यावसायिक व इतर विक्रेत्यांना ओला, सुका कचरा स्वतंत्ररीत्या संकलित करण्यासाठी दोन वेगवेगळ्या कचरापेट्या ठेवणे बंधनकारक करावे.पावसाळ्याच्या आधी सर्व नाल्यांजवळ साचलेल्या कचºयाची विल्हेवाट लावावी. उघड्यावर कचरा फेकणाºयांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी.१०० किलोपेक्षा जास्त कचरा निर्माण करणाºया गृहनिर्माण संस्था, व्यापारी, खाजगी, आस्थापना, कृषी उत्पन्न बाजार समिती, हॉटेल व्यावसायिक यांच्यामार्फ त कचºयाची योग्य शास्त्रीय विल्हेवाट लावल्या जात नसेल तर त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करावी.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबाद