शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
3
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
4
प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले, आई बनली हैवान; पोटच्या पोराला कायमचं संपवलं
5
बाजारात आज पुन्हा तेजी! हिरो-सिप्लासह 'या' क्षेत्रात चांगली वाढ, तर अदानी-ITC ठरले फ्लॉप
6
'आमच्याकडे ब्रह्मोस आहे', शाहबाज शरीफ यांच्या विधानावर असदुद्दीन ओवैसी संतापले
7
लेक हुशार, डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं, पण वडिलांना नव्हतं मान्य! दूधातून गुंगीचं औषध दिलं अन्...
8
चीन-अमेरिका सैन्यात समुद्रात चकमक, ट्रम्पच्या धोकादायक जहाजाला क्षेत्राबाहेर हाकलून लावलं...
9
जुलैमध्ये 'या' कारचं नशीब अचाकनच 'चमकलं'; खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; 4 महिन्यांचा विक्रम मोडला!
10
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
11
जत्रेतील आकाश पाळण्याला लटकली महिला, पाहणाऱ्यांच्या तोंडचं पळालं पाणी, अखेर...  
12
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
13
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
14
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
15
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
16
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
17
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
18
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
19
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
20
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)

तेजस ठाकरे युवासेनेच्या प्रमुखपदी ? वरुण सरदेसाई यांनी केले मोठे विधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 14:51 IST

Tejas Thackeray as Yuvasena chief ? पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thakarey ) हे लवकरच युवासेना प्रमुखपद सोडतील. भाऊ तेजस ठाकरे यांच्याकडे ते युवासेनेची जबाबदारी सोपवतील अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे.

ठळक मुद्देयुवासैनिकांना उमेदवारी देण्याचा निर्णय स्थानिक नेतेच घेणार

औरंगाबाद : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ( CM Uddhav Thackrey) यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे ( Tejas Thackrey ) हे युवा सेनेची ( Yuva Sena ) कमान सांभाळणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू असली तरी युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी यावर मोठे विधान केले आहे. तेजस हे वन्यजीव प्रेमी आहेत. सध्या त्यांची आवड ही वाईल्डलाईफकडेच आहे. सध्या ते राजकारणात येणार नाहीत. त्यांना राजकारणात यायचे असेल तर त्याचा निर्णय ते स्वत: आणि शिवसेनेचे ( Shive Sena ) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे घेतील, असे ठाकरे घराण्यांशी जवळीक असलेले सरदेसाई ( Varun Sardesai ) यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले. ( Big statement made by Varun Sardesai on Tejas Thackeray as Yuvasena chief ? )

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thakarey ) हे लवकरच युवासेना प्रमुखपद सोडतील. भाऊ तेजस ठाकरे यांच्याकडे ते युवासेनेची जबाबदारी सोपवतील अशी राजकीय वर्तुळात सध्या चर्चा सुरु आहे. दरम्यान, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांनी तेसज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त 'सामना'मधून दिलेल्या शुभेच्छांमुळे ते राजकारणात लवकरच प्रवेश करतील अशी शक्यता वर्तविण्यात आली. यावर युवासेनेचे सचिव वरूण सरदेसाई यांनी औरंगाबादेत प्रतिक्रिया दिली आहे. तेजस हे वन्यजीव प्रेमी आहेत. अनेक वर्ष राज्यातील बहुतांश जंगलात जाऊन त्यांनी विविध प्रजातींचा शोध घेतला आहे. सध्या त्यांची आवड ही वाईल्डलाईफकडेच आहे. त्यांना राजकारणात यायचे असेल तर त्याचा निर्णय ते स्वत: आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे घेतील, असे मत सरदेसाई यांनी व्यक्त केले.

रावसाहेब दानवेंना शुभेच्छा देणार नाही तर कराड मला भेटायला येतील :चंद्रकांत खैरे

युवासैनिकांना तिकिटाचा निर्णय स्थानिक शिवसेना नेते घेतील युवासेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी वरुण सरदेसाई सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते म्हणाले, या संपूर्ण दौऱ्यातून संघटन मोठे करण्याचा प्रयत्न आहे. युवा सेनेचा कार्यकर्ता, पदाधिकारी चांगले काम करीत असेल तर स्थानिक शिवसेनेचे ज्येष्ठ नेते त्या कार्यकर्त्याला निवडणुकीत उमेदवारीची संधी देतील. तिकिट वाटप, निवडणुकांचे निर्णय शिवसेनेचे नेते घेत असतात. त्यांचा निर्णय युवासैनिकांना मान्य असेल. युवासेनेसाठी वेगळा विशेष कोटा निवडणुकीत असावा, असा विषय नाही. जो चांगले काम करीत ते पुढे येईल. असेही सरदेसाई यांनी स्पष्ट केले. यावेळी अमेल घोले, आदित्य शिरोडकर, राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, ऋषिकेश जैस्वाल, किरण तुपे, मिथून व्यास आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाAurangabadऔरंगाबाद