शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक दिन : शिक्षकामुळेच आज आयपीएस बनले : मोक्षदा पाटील 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 15:20 IST

मराठी साहित्य शिकविणारे शिक्षक प्रवीण चव्हाण हे आदर्श

ठळक मुद्देआयुष्याला कलाटणी देणारे गुरूसर्वधर्म समभावाचे बाळकडू मिळाले कठोर परिश्रम घेण्याची प्रेरणा मिळाली

औरंगाबाद : शालेय जीवनापासून ते भारतीय पोलीस सेवेत येईपर्यंत अनेक शिक्षक भेटले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची पुणे येथे तयारी करीत असताना एका खाजगी कोचिंग क्लासेसचे मराठी साहित्य शिकविणारे प्रवीण चव्हाण सर हे माझ्यासाठी आदर्श शिक्षक आहेत. 

चव्हाण सरांमुळेच आज मी आयपीएस अधिकारी होऊ शकले. आयपीएस अधिकारी होण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता माझ्यात असल्याचे त्यांनीच मला पटवून दिले. एवढेच नव्हे तर त्यांनी मला वेळोवेळी अचूक मार्गदर्शन केले. चव्हाण सर नसते तर आयपीएस अधिकारी होण्याची क्षमता माझ्यात आहे, हे मला आयुष्यभर कळाले नसते, अशी कृतज्ञतेची भावना औरंगाबादच्या जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी त्यांच्या शिक्षकांप्रती व्यक्त केली.

मोक्षदा पाटील म्हणाल्या की, केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी पुणे येथे गेले तेव्हा या परीक्षेत यश मिळेल अथवा नाही, याबाबत मनात साशंकता होती. द्विधा मन:स्थिती असताना खाजगी कोचिंग क्लास चालविणारे प्रवीण चव्हाण सर भेटले. ते मराठी साहित्य शिकवीत असत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले सर्व गुण आणि क्षमता माझ्यात असल्याचे चव्हाण सरांनी पटवून दिले. त्यांच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. मराठी साहित्याची आपल्याला बालपणापासून आवड असल्याचे पाहून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी ऐच्छिक विषय म्हणून मराठी साहित्य निवडला होता. त्यांनी सतत अचूक मार्गदर्शन केल्याने आयपीएस होण्याचे स्वप्न पूर्ण झाले. 

आई-वडील हे पहिले गुरु माझे आई-वडील हे पहिले तर चव्हाण सर हे आयुष्याला कलाटणी देणारे दुसरे गुरू आहेत. आई-वडील आणि चव्हाण सरांमुळे आज आपण येथे आहोत.  आई-वडिलांनी आपल्याला स्त्री-पुरुष, जाती-भेद, धर्म-भेद असे कधीच करू दिले नाही. घरातूनच मला सर्वधर्म समभावाची शिकवण मिळाली. आयपीएस अधिकारी कधीच जाती-धर्मानुसार विचार करीत नाही. मला              सर्वधर्म समभावाचे घरातूनच बाळकडू मिळाले असल्याने आता पोलीस अधीक्षक म्हणून काम करीत असताना त्याचा लाभ होतो.  

कठोर परिश्रम घेण्याची प्रेरणा मिळालीचव्हाण सरांनी आपल्या क्षमतांना आव्हान दिले. परीक्षेची तयारी करीत असताना होत असलेल्या चुका कठोरपणे सांगितल्या. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपल्याला न थकता सतत अभ्यास करण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्यामुळेच मी कठोर परिश्रम करून यश संपादन करू शकले. सरांच्या मार्गदर्शनामुळेच मला जाणीव झाली होती की, मी ज्या पद्धतीने विचार करते ते योग्य आहे किंवा नाही. एवेढच नव्हे तर माझ्या बुद्धीला अजून धार येण्यासाठी काय करावे लागेल, यादृष्टीने सतत प्रयत्न करीत असत. 

धडाकेबाज कामगिरीने वेधले लक्षऔरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकपदी पाच महिन्यांपूर्वी रुजू झाल्यापासून  मोक्षदा पाटील यांची धडाकेबाज कामगिरी सुरू आहे. ऑनलाईन फसवणूक  झालेल्या नागरिकांना त्यांनी त्यांचे पैसे परत मिळवून दिले. चोरट्यांनी पळविलेला सुमारे ५० लाखांचा मुद्देमाल त्यांनी तक्रारदारांना परत केला. शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या तीन ते चार गँगचा पर्दाफाश करून त्यांंना अटक  केली. 

( शब्दांकन : बापू सोळुंके ) 

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनAurangabadऔरंगाबादPoliceपोलिस