शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची सक्ती नाही; शिक्षणाधिकाऱ्यांनी काढले सुधारित आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 19:05 IST

प्रभाव लोकमतचा : सोमवारपासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी पैठण यांनी व्हाट्सएप द्वारे तालुक्यातील शिक्षकांना दिल्या होत्या. 

पैठण : शाळा पूर्वतयारीची कामे पूर्ण झाली असल्यास शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याबाबत सक्ती करू नये असे सुधारित आदेश जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी आज काढले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रभारी गटशिक्षणाधिकारी पैठण यांनी व्हाट्सएपवर संदेश देत शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याबाबत आदेश बजावले होते. या बाबत शिक्षकसेनेने आक्षेप घेतला  तर लोकमतने सविस्तर वृत्त  दि २३ जून  रोजी प्रकाशित केले होते. लोकमत वृत्ताची दखल घेत शिक्षणाधिकारी यांनी सुधारीत आदेश काढल्याने शिक्षक सेनेने लोकमतचे आभार मानले आहेत

सोमवार पासून शाळेत हजर राहण्याच्या सूचना प्रभारी गटशिक्षणाधिकारी पैठण यांनी व्हाट्सएप द्वारे तालुक्यातील शिक्षकांना दिल्या होत्या. व्हाट्सएप वरील या आदेशाने शिक्षक वर्गात मोठा संभ्रम निर्माण झाला होता, स्पष्ट लेखी आदेश जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत शिक्षकांनी शाळेत हजर होऊ नये असे आवाहन शिक्षक सेनेने केले होते. कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी राज्य स्तरावर  ऑनलाईन शिक्षण चालू ठेवून शाळा प्रत्यक्ष बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.  तर पैठण तालुक्यातील बहुतेक शिक्षक हे औरंगाबाद शहरातून ग्रामीण भागात ये-जा करत असतात.अशा परिस्थितीत सर्व शिक्षकांना अचानक शाळेत बोलावल्याने ग्रामीण भागात कोरोना संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला होता.  त्यामुळे जोपर्यंत स्पष्ट आदेश प्रशासन देत नाही, तोपर्यंत शिक्षकांनी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित न राहण्याचे आवाहन  शिक्षक सेनेच्या वतीने करण्यात आले होते. या बाबत लोकमतच्या दि २३ रोजीच्या अंकात बातमी प्रकाशित करून वास्तव परिस्थितीवर प्रकाश टाकण्यात आला होता. लोकमतच्या बातमीची दखल घेत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जैस्वाल यांनी २१ जून रोजी काढलेल्या संदिग्ध पत्राबाबत शाळा पूर्वतयारीची कामे पूर्ण झाली असल्यास शिक्षकांना शाळेत उपस्थित राहणेबाबत सक्ती करू नये असे आदेश दिले. शिक्षकांच्या उपस्थिती बाबतची संदिग्धता दूर केल्याबद्दल शिक्षक सेनेच्या वतीने जिल्हा प्रसिद्धिप्रमुख महेश लबडे, तालुकाप्रमुख अमोल एरंडे, कैलास मिसाळ, अमोलराज शेळके, पांडुरंग गोर्डे, अजिनाथ दहिफळे, युनूस शेख, शिवाजी दुधे, देविदास फुंदे, लक्ष्मण गलांडे, मोहन घरगणे, उद्धव बडे, संदीपान बेडदे, भाग्यश्री मुरकुटे, सुनीता पवार, सुनीता दरे, अर्चना संकपाळ, माया गुगळे, आदींनी लोकमत व शिक्षणाधिकारी यांचे आभार मानले आहेत.

कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात पसरू नये म्हणून शिक्षकांनी शाळा पूर्वतयारीची कामे पूर्ण झाल्यास घरी राहून ऑनलाइन पध्दतीने मुलांना शिक्षण द्यावे, त्यासाठी सक्तीने शाळेत उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट आदेश दिल्याने शिक्षकांच्या उपस्थितीबाबतचा संभ्रम दूर झाला आहे. 'दैनिक लोकमत' नी या प्रश्नास वाचा फोडल्याबद्दल आभार.- अमोल एरंडे, तालुकाप्रमुख शिक्षक सेना पैठण

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद