शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

भर वर्गात अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या शिक्षकाला १४ वर्षे सश्रम कारावास आणि दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 11:14 PM

भर वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) याला बुधवारी (दि.१०) विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १४ वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला.

औरंगाबाद : भर वर्गात अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत लैंगिक चाळे करणारा शिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) याला बुधवारी (दि.१०) विशेष न्यायाधीश ए. एस. खडसे यांनी १४ वर्षे सश्रम कारावास आणि साडेपाच हजार रुपये दंड ठोठावला.विशेष म्हणजे खटल्याच्या सुनावणीदरम्यान पीडित मुलगी, तिची आई व मुलीच्या ३ मैत्रिणी, असे ५ साक्षीदार फितूर झाले असतानाही न्यायालयाने सबळ पुराव्याआधारे ‘पोस्को’ कायद्यान्वये ही शिक्षा ठोठावली आहे.यासंदर्भात खामगाव येथील पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली होती की, ३० डिसेंबर २०१७ रोजी फिर्यादी शेतात काम करीत असताना पीडित मुली (वय १०) ची मैत्रीण त्यांच्याकडे गेली. वर्गशिक्षक सोहेल अब्दुल रऊफ पठाण (२७, रा. कटकटगेट, औरंगाबाद) हा वर्गातील इतर मुलांना डोळे बंद करायला लावून पीडित मुलीला पाठीमागच्या बाकावर बसवून तिच्याशी लैंगिक चाळे करतो, करायला लावतो व असा प्रकार त्याने अनेकदा केला, असे सांगितले. फिर्यादीने मुलीला विश्वासात घेऊन विचारले असता, वर्गशिक्षक सोहेलने असा प्रकार चारदा केल्याचे तिने सांगितले. विरोध केल्यावर सोहेल पाठीवर चापटीने मारहाण करीत असल्याचेही तिने सांगितले. फिर्यादीने ८ जानेवारी २०१८ रोजी तक्रार दिल्यावरून भादंविच्या कलम ३५४, ३५४ (अ) सहबाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या (पोस्को) कलम ८ व १२ अन्वये वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.खटल्याच्या सुनावणीच्या वेळी सहायक सरकारी वकील कैलास पवार यांनी ११ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. यात डॉक्टराची साक्ष महत्त्वाची ठरली. मात्र सुनावणीदरम्यान पीडित मुलगी, तिची आई व तीन मैत्रिणी असे ५ साक्षीदार फितूर झाले.सुनावणीअंती बाललैंगिक अत्याचार सिद्ध झाल्यामुळे न्यायालयाने आरोपीला भादंवि कलम ३५४ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला. तसेच कलम ३२३ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास आणि पाचशे रुपये दंड, ‘पोस्को’कायद्याच्या कलम ६ अन्वये १४ वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड , कलम ८ अन्वये पाच वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड आणि कलम १२ अन्वये तीन वर्षे सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंड ठोठावला.----------

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीTeacherशिक्षक