शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आई-वडील वेळ देत नाहीत, वाढदिवसाच्या दिवशीच मुलीने मैत्रिणीसह सोडले घर

By राम शिनगारे | Updated: March 1, 2023 18:40 IST

एमआयडीसी सिडको ठाण्तयात अपहरणाचा गुन्हा दाखल होताच १८ तासांत पोलिसांनी काढले शोधून

छत्रपती संभाजीनगर : शिक्षक आई-वडील घरात वेळ देत नाहीत. त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशीच १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीने दोन मैत्रिणींना सोबत घेत खास फिरायला जाण्यासाठी घर सोडले. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास चिकलठाणा परिसरात घडला. या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलींच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविल्यानंतर १८ तासांच्या आत मुलींचा शोध घेतल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

एमआयडीसी सिडको पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका खासगी शाळेत शिक्षक असलेल्या दाम्पत्याची १३ वर्षांची मुलगी सातवीच्या वर्गात शिक्षण घेते. तिच्यासोबत सर्वसामान्य कामगारांच्या १२ वर्षे वयाच्या दोन मुलीही सातवीतच शिक्षण घेतात. त्या तिघी वर्गमैत्रिणी आहेत. शिक्षकाच्या मुलीचा मंगळवारी वाढदिवस होता. आई-वडील वेळ देत नाहीत, बाहेर फिरायला घेऊन जात नाहीत, त्यामुळे त्यांच्यासोबत राहण्याचाच कंटाळा आला. त्यामुळे आपणच कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, असा प्लॅन शिक्षकाच्या मुलीने बनवला. तिघींपैकी एक मुलगी फिरायला जाण्यासाठी तत्काळ तयार झाली. एक तयार नव्हती. तेव्हा दोघींनी तिला शपथ घातली. त्यामुळे तिसरीही तयार झाली.

तिघींनी मंगळवारी सायंकाळी सहा वाजता घर सोडले. चिकलठाणा परिसरातूनच ऑटोरिक्षात बसून रेल्वेस्थानक गाठले. तिन्ही मुली आठ वाजण्याच्या सुमारास मनमाडकडे जाणाऱ्या रेल्वेत बसल्या. मनमाडला रात्री दहा वाजण्याच्या सुमारास उतरल्या. त्यांनी रेल्वे स्थानकावरच रात्र काढली. रात्रीतून त्यांचा विचार बदलला. बुधवारी सकाळीच छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने येणाऱ्या रेल्वेत बसल्या. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्या रेल्वे स्थानकात पाेहोचल्या. तेथून पुन्हा ऑटोरिक्षातुन चिकलठाणा परिसरात आल्या. त्याच परिसरात पोलिस सीसीटीव्हीची तपासणी करीत असताना त्यांना त्या दिसल्या. या मुलींनी मनमाडला जाताना आणि येतानाही रेल्वेचे तिकीट काढले नव्हते. शिक्षक वडिलांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तिघींच्या अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता. मुली सापडल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर बाल न्यायमंडळासमोर हजर केल्यानंतर संबंधितांचा ताबा पालकांकडे देण्यात येणार असल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद