शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदलीनंतर गुरुजींची शाळेकडे पाठ, नोटिसा बजावायच्या कोणाला !

By विजय सरवदे | Updated: October 8, 2022 19:09 IST

पदस्थापनेनंतर शाळेला दांडी मारल्याने प्रशासनासमोर पेच निर्माण झाला आहे

- विजय सरवदेऔरंगाबाद : आंतरजिल्हा बदलीने आलेल्या ६३ शिक्षकांना जि. प. प्रशासनाने समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिल्या. मात्र, यापैकी सुमारे ३० शिक्षकांना गैरसोयीच्या शाळा मिळाल्यामुळे ते अद्याप नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेच नाहीत. त्यामुळे आता प्रशासनाने त्यांना नोटिसा काढल्या आहेत; परंतु ते शाळेत जात नाहीत. कुठे राहतात, त्याचा ठावठिकाणा नाही. त्यांना नोटिसा तरी बजावाव्या कुठे, असा मोठा पेच प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.

आंतरजिल्हा बदलीचे आदेश २४ ऑगस्ट रोजी ऑनलाइन निर्गमित झाले. या जिल्हा परिषदेच्या शाळांतील १६८ शिक्षक बदलीने दुसऱ्या जिल्ह्यात गेले. मात्र, दुसऱ्या जिल्ह्यातून १४९ शिक्षक या जिल्ह्यात येणार होते; परंतु आतापर्यंत अवघे ६३ शिक्षक शिक्षण विभागात रुजू झाले. त्यांना २१ सप्टेंबर रोजी समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यात आल्या. मात्र, अनेकांना गैरसोयीच्या शाळांमध्ये पदस्थापना मिळाली. अनेकांच्या पती-पत्नीची फाटाफूट झाली. पतीला एका तालुक्यात, तर पत्नीला ६०-७० किमी दूर दुसऱ्या तालुक्यात पदस्थापना मिळाली. त्यामुळे ६३ पैकी जवळपास ३० शिक्षक पदस्थापना मिळालेल्या ठिकाणी रुजूच झाले नाहीत. त्यांना पदस्थापना बदलून हवी आहे.

वीस दिवसांचा कालावधी झाला तरी नियुक्त शाळांवर शिक्षक रुजू न झाल्यामुळे शिक्षण विभागाने आता त्यांना कारणे दाखवा नोटिसा काढल्या आहेत; पण त्या बजावण्याचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एक तर ते शाळेवर जात नाहीत. त्यामुळे मुख्याध्यापक अथवा गटशिक्षणाधिकारी त्या शिक्षकांपर्यंत नोटीस पोहोचवू शकत नाहीत. दुसरीकडे, ते कुठे राहतात, त्याचा पत्ताही प्रशासनाकडे नाही.

८६ शिक्षकांची प्रतीक्षाचआंतरजिल्हा बदली झाल्यानंतर येथून १६८ शिक्षक तत्काळ कार्यमुक्त करण्यात आले. बदलीने दुसऱ्या जिल्ह्यांतून १४९ शिक्षक येणार होते; परंतु आतापर्यंत अवघे ६३ शिक्षक येथे रुजू झाले आहेत. उर्वरित ८६ शिक्षक अद्यापही जिल्हा परिषदेत पोहोचलेले नाहीत. त्यामुळे येथील जि. प. शाळांमध्ये गुरुजींचा तुटवडा निर्माण झाला आहे. आता परीक्षा तोंडावर आल्या आहेत. अभ्यासक्रम पूर्ण झालेला नाही. एका शिक्षकाला सध्या अनेक वर्गांचा भार सांभाळावा लागत आहे. १० टक्क़्यांपेक्षा जास्त रिक्त जागा असतील, तर शिक्षकाला कार्यमुक्त करू नये, असे शासनाचे आदेश आहेत. त्यामुळे कदाचित हे शिक्षक आलेले नसावे, अशी सूत्रांची माहिती आहे.

 

टॅग्स :Teacherशिक्षकAurangabadऔरंगाबादAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषद