छत्रपती संभाजीनगर : स्थगिती सरकारच्या काळात शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी केवळ ३ कोटी रुपये दिले होते. शहराचा विकास रोखला होता. धनुष्यबाणाला मतदान करून शहरवासीयांच्या तोंडचे पाणी पळवणाऱ्या उद्धवसेना, काँग्रेसचा बंदोबस्त करा, असे आवाहन शिंदेसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (दि.११) सायंकाळी येथे आयोजित जाहीरसभेत केले.
शिंदेसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ एकनाथ शिंदे यांची रविवारी सायंकाळी टी.व्ही. सेंटर येथील फुटबॉल मैदानावर जाहीर सभा झाली. पालकमंत्री संजय शिरसाट, खा. संदीपान भुमरे, आ. संजना जाधव, आ. प्रदीप जैस्वाल, आ. रमेश बोरनारे, माजी आ. किशनचंद तनवाणी, जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, शहराचे छत्रपती संभाजीनगर असे नामांतर केल्यानंतर प्रथमच होत असलेल्या निवडणुकीसाठी आपली सर्वांची जबाबदारी वाढली आहे. महापालिकेवर आपला महापौर बसवायचा आहे आणि ज्या रशीद मामूने शहराच्या नामांतराला विरोध केला त्याला तिकिट देणाऱ्यांचा कार्यक्रम करायचा आहे. इम्तियाज जलील यांना जलील करायचे आहे. हिंदुत्वाचे मारेकरी शहरात हातपाय पसरवत आहेत. ही सर्वांसाठी धोक्याची बाब आहे. उठता बसता मला आणि आपल्या शिवसेनेला ते नकली म्हणत असतात. मात्र, बाळासाहेबांचे विचार तुम्ही ज्या दिवशी सोडले त्याच दिवसापासून तुम्ही नकली झाला. आम्ही जर नकली असतो, तर जनतेने विधानसभेत एवढे मोठे आमदार निवडून दिले नसते. नगर परिषद निवडणुकीत ७० नगराध्यक्ष आणि १४०० नगरसेवक जनतेने निवडून दिले. असा निकाल देऊन जनतेने त्यांना चांगलेच आपटले, असे शिंदे म्हणाले. त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालावधीत लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, मुलींचे उच्च शिक्षण मोफत अशा कितीतरी योजना आणल्याचे सांगितले.
शहराला दोन महिन्यांत २०० एमएलडी पाणीशहराच्या पाणीपुरवठा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे. या योजनेच्या पहिल्या टप्प्याचे २०० एमएलडी पाणी दोन महिन्यांत लाडक्या बहिणींना मिळेल. यंदाच्या उन्हाळ्यात पाणीटंचाई भासणार नाही. पाण्यासाठी बहिणींना त्रास होऊ नये, याची काळजी तुमचा लाडका भाऊ घेत असल्याचे शिंदे म्हणाले.
सिडको फ्री होल्ड, गुंठेवारीमध्ये पी. आर. कार्डआपल्याकडे नगरविकास आणि गृहनिर्माण विभाग आहे. यामुळे सिडकोतील रहिवाशांचा फ्री होल्ड आणि गुंठेवारी भागातील रहिवाशांना पी. आर. कार्ड देण्याचा निर्णय लवकरच घेण्यात येईल, असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
शिंदसेनेचा निवडणूक वचननामाचे प्रकाशनमहापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेने तयार केलेला वचननामा शिंदे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशित करण्यात आला. हा जाहीरनामा नव्हे, तर वचननामा असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे म्हणाले, पतंग कटला...एकनाथ शिंदे यांचे भाषण सुरू असताना दोर कापल्यामुळे एकापाठोपाठ दोन पतंग सभेत आली. ही पतंग पाहून शिंदे म्हणाले, पतंग कुणाची निशाणी आहे का ? उपस्थित म्हणाले की, जलील यांची निशाणी आहे. त्यावर शिंदे म्हणाले, त्यांचा पतंग कटला आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांना प्रतिसाद दिला.
Web Summary : Eknath Shinde criticized Uddhav Sena and Congress for neglecting Aurangabad's water supply during their tenure. He urged citizens to support Shinde Sena in the upcoming elections, promising improved infrastructure and water access. He also promised free hold for CIDCO residents.
Web Summary : एकनाथ शिंदे ने उद्धव सेना और कांग्रेस पर अपने कार्यकाल के दौरान औरंगाबाद की जल आपूर्ति की उपेक्षा करने का आरोप लगाया। उन्होंने नागरिकों से आगामी चुनावों में शिंदे सेना का समर्थन करने का आग्रह किया, बेहतर बुनियादी ढांचे और पानी की पहुंच का वादा किया।