शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

पेट्रोल-डिझेल वाहनांना ‘टाटा’; ई-वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 19:02 IST

औरंगाबादेत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर ९८ रुपये झाला आहे.

ठळक मुद्देऔरंगाबादेतील रस्त्यावर धावताहेत ८७७ ई-व्हेइकल्स

- संतोष हिरेमठ

औरंगाबाद : पेट्रोलपंपावर इंधन भरण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगा आता एकदाचे डोळेभरून पाहून घ्या. कदाचित आगामी काळात हे दृश्य पहायला मिळेलच हे सांगणे कठीण आहे. कारण अनेक जण पेट्रोल, डिझेल वाहनांना टाटा...बायबाय... करत आहेत आणि ई-व्हेइकल्स म्हणजे ईलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी खरेदी करीत आहेत. औरंगाबादेत गेल्या ३ वर्षांत प्रत्येकवर्षी जेवढी ई-वाहने वाढत गेली, त्यापेक्षाही अधिक वाहने यंदा ७ महिन्यांतच वाढली आहेत. ई-चारचाकींची संख्या यात अधिक आहे.

इंधनाचे वाढते दर आणि त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची होणारी आर्थिक परवड, हा विषय सार्वजनिक चर्चेचा व समस्येचाही आहे. औरंगाबादेत पेट्रोलचा दर प्रतिलिटर १०९ रुपये, तर डिझेलचा प्रतिलिटर ९८ रुपये झाला आहे. आर्थिक भुर्दंडाबरोबरच इंधनाच्या वाहनांमुळे प्रदूषणही वाढते. यावर उपाय म्हणून ई-वाहनांना चालना देण्याचे धोरण देशपातळीवर स्वीकारण्यात आले आहे. औरंगाबादेतदेखील या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेकडून प्रयत्न केले जात आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील वाहनांची संख्या १५ लाख ३१ हजारांवर गेली आहे. यामध्ये गेल्या काही वर्षांपासून ई-वाहनांची भर पडते आहे. ई-वाहन म्हटले की, आधी फक्त दुचाकी नजरेसमोर येत होती. परंतु आता ई-चारचाकी वाहनेही रस्त्यावर धावत आहेत. सध्या या वाहनांचे प्रमाण इतर वाहनांच्या तुलनेत कमी आहे. मात्र, त्यांची संख्या आता वाढत आहे.

ई-वाहनांकडे का वाढतोय ओढा ?- पेट्रोलच्या तुलनेत विजेचा कमी खर्च- चार्जिंग करा अन्‌ बिनधास्त चालवा- आवाजाची पातळी अत्यंत कमी- देखभाल-दुरुस्ती खर्च अत्यल्प- ई-दुचाकी वजनाला हलकी-फुलकी-आरटीओ करात सवलत

यावर्षी नोंदणी वाढलीई-वाहनांच्या नोंदणीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या ई-वाहनांची गती २५ किमी प्रतितासापेक्षा कमी आहे, अशा वाहनांची नोंदणी करण्याची गरज नाही. ई-वाहनांसाठी करात सवलतही मिळते.- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी

औरंगाबादेत ईलेक्ट्रिक वाहनांची अशी पडली भरवर्ष-----दुचाकी-----चारचाकी----एकूण२०२१(जुलैपर्यंत)-२५८----२०---२७८२०२०---१५०----५----१५५२०१९---२२२-----१----२२३२०१८---२१९-----२----२२१

टॅग्स :tourismपर्यटनAurangabadऔरंगाबादelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर