शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

३०-३० घोटाळ्यातील एजंट निशाण्यावर; पैठणमधून एकाचे अपहरण, रांजणगावहून झाली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2022 19:10 IST

रक्कम तिप्पट होण्याच्या लालसेने गुंतवलेली अनेकांचे लाखो रुपये बुडाल्याने पैसे जमा करणारे एजंट सध्या तोफेच्या तोंडावर आहेत.

पैठण (औरंगाबाद) : बुधवारी पैठण शहरातून अपहरण करण्यात आलेल्या तीस-तीस आर्थिक घोटाळ्यातील एजंटची अवघ्या काही तासांतच पैठण पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथून गुरूवारी सुखरुप सुटका केली आहे.. या प्रकरणातील तीन अपहरणकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. तर दोन आरोपी वाहनांसह फरार होण्यात यशस्वी झाले आहेत. 

रक्कम तिप्पट होण्याच्या लालसेने गुंतवलेली अनेकांचे लाखो रुपये बुडाल्याने पैसे जमा करणारे एजंट सध्या तोफेच्या तोंडावर आहेत. राज्यभर तीस-तीस या नावाने हा आर्थिक घोटाळा गाजलेला आहे. पैठण तालुक्यातील बोकुडजळगाव येथील एजंटचे अपहरण करण्यामागे तीस-तीस घोटाळाच असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बिडकीन येथील तीस-तीस आर्थिक घोटाळ्यातील एजंट दिलीप जानु चव्हाण( रा. बोकुड जळगाव तालुका पैठण) हा बुधवारी चार वाजेच्या दरम्यान पैठण येथील रजिस्टरी कार्यालयात जमिनीची रजिस्ट्री करण्यासाठी आला होता. दरम्यान, मारोती मुरलीधर नागे, रामनाथ मुरलीधर कोल्हे, कृष्णा कल्याण तरमळे, पांडुरंग सदाशिव नागे, दिनेश प्रमोद राठोड (रा. बोकुड जळगाव पैठण) यांनी दिलीप चव्हाणचे अपहरण केले. दरम्यान अपहरणकर्त्यांनी चव्हाणच्या मामास  भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधून तुमच्या भाच्याने आम्हाला पंचवीस लाख रुपयाला बुडविले आहे. पंचवीस लाख रुपये आम्ही सांगतो त्या ठिकाणी घेऊन या नसता तुमच्या भाच्याला कापून टाकू अशी धमकी दिली.

याबाबत दिलीप चव्हाण यांची पत्नी कविता चव्हाण हिने पैठण पोलिस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली. फिर्यादीत माझ्या नवऱ्याचे अपहरण कृष्णा तरमळे व दिनेश राठोड यांनी केले असा संशय व्यक्त केला होता. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पैठणचे पो.नि. किशोर पवार यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. बुधवारी रात्री मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पो.नि. किशोर पवार यांच्या पथकाने पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथील एका लॉजवर छापा टाकून अपहरण झालेल्या दिलीप चव्हाणची सुटका केली.  

यावेळी पोलिसांनी मारोती मुरलीधर नागे, रामनाथ मुरलीधर कोल्हे, दिनेश प्रमोद राठोड या तिघांना अटक केली तर कृष्णा कल्याण तरमळे व पांडुरंग सदाशिव नागे हे दोघे फरार झाले.  सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ विशाल नेहूल यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. किशोर पवार, उपनिरीक्षक सतिष भोसले, पो.का. महेश माळी, संतोष चव्हाण, भाऊसाहेब तांबे, संतोष खिळे, गोपाळ पाटील, सुधीर वाव्हळ,  यांच्या पथकाने पार पाडली.

पोलिसांनी अशी केली सुटका सहा महिन्यांपूर्वी पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोट्यवधी रुपयांचा तीस-तीस नावाचा आर्थिक घोटाळा पोलिसांनी उघडकीस आणला होता. या घोटाळ्यात दिलीप जानु चव्हाण याने तीन आरोपींकडून दाम दुप्पट करुन देतो म्हणून पंचवीस लाख रुपये घेतल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. दरम्यान बुधवारी दिलीप चव्हाण हा जमीन खरेदी विक्रीसाठी पैठण येथे आला आहे अशी माहिती आरोपींना मिळाली. यावेळी चव्हाण व आरोपी यांची भेट झाल्यावर त्यांच्यात पैशाच्या देवाणघेवाणवरुन वाद झाला. त्यानंतर आरोपींनी दिलीप चव्हाण याचे अपहरण केले. त्यास वाहनांत बसवून पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपती येथे नेले होते. पोलीसांनी तत्काळ सुत्रे हलवीत पहाटे तीन वाजेच्या दरम्यान लॉजवर छापा टाकून दिलीप चव्हाणची सुटका केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद