शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

'लक्ष्य आंतरराष्ट्रीय विमानसेवेचे'; औरंगाबाद विमानतळाचा बुद्धिस्ट सर्किटसाठी पाठपुरावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:40 IST

 कोलंबो-मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणण्याची  मागणी

ठळक मुद्दे५० विमाने हाताळण्याची क्षमताप्राधिकरणाने दिले प्रस्ताव

औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरून उदयपूर विमानसेवेच्या शुभारंभप्रसंगी बुधवारी एअर इंडियाकडे विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी कोलंबो - मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणण्याची मागणी केली. विमानतळासाठी कस्टमचे मनुष्यबळ उपलब्ध झाले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी विमानतळ सज्ज आहे. बुद्धिस्ट सर्किटच्या कनेक्टिव्हिटीसह आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी यापुढे प्रयत्न आणि पाठपुरावा केला जाईल, असा विश्वास विमानतळ प्राधिकरण आणि उद्योजकांनी व्यक्त केला.

एअर इंडियाच्या मुंबई-औरंगाबाद- उदयपूर विमानाच्या उड्डाणानंतर बुधवारी उपस्थित मान्यवरांनी विमानसेवेसंदर्भात संवाद साधला. हॉटेल उद्योजक सुनीत कोठारी म्हणाले, एअर इंडियाने अनेक वर्षांची मागणी पूर्ण केली. एखादी विमानसेवा सुरू झाली की, त्याला प्रतिसाद वाढत जातो, हे स्पाईस जेटच्या औरंगाबाद-दिल्ली विमानसेवेवरून दिसून येत आहे. विविध शहरांसाठी विमानसेवेची मागणी करण्यात आलेली आहे. गया येथे यावर्षी थायलंडहून आंतरराष्ट्रीय विमाने येणार आहेत. ही विमाने औरंगाबादला आणण्याची मागणी केली जात आहे. औरंगाबाद-भोपाळ- गया अशी विमानसेवा शक्य आहे. गया येथे जाणारे लोक नंतर वाराणसी, लखनऊ येथे जातात. तेथून ते परत थायलंडला जातात. ही विमान वाहतूक औरंगाबादला आली पाहिजे, असे ते म्हणाले. उद्योजक ऋषी बागला म्हणाले, औरंगाबादेत ऐतिहासिक, धार्मिकस्थळे आहेत. ‘डीएमआयसी’मुळे देशातील पहिले मॉडर्न शहर होत आहे. विमानसेवा उपलब्ध होत असल्याने पुढे वापर वाढत जाईल. इटालीहून औरंगाबादला येण्यासाठी ३६ घंटे लागतात. हा वेळ कमी होण्याची गरज आहे. 

५० विमाने हाताळण्याची क्षमतायाप्रसंगी कोलंबो - मुंबई विमान औरंगाबादपर्यंत आणावे, अशी मागणी विमानतळाचे संचालक डी. जी. साळवे यांनी  एअर इंडियाचे सेल्स व्यवस्थापक संतोष नायर यांच्याकडे केली. चिकलठाणा विमानतळाची दिवसभरात ५० विमाने हाताळण्याची क्षमता आहे. नाईट पार्किंगची सुविधा मोफत दिली जात आहे. त्या माध्यमातूनही विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचे साळवे यांनी सांगितले.

प्राधिकरणाने दिले प्रस्तावथायलंडच्या राजदूताना औरंगाबादहून बँकॉकसह आशियाई देशांसाठी विमानसेवा सुरू करून आंतरराष्ट्रीय हवाई कनेक्टिव्हिटीसाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे प्रस्ताव देण्यात आलेला आहे. अमेरिकेचे भारतातील राजदूत केनेथ जस्टर यांनाही प्राधिकरणातर्फे आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी प्रस्ताव सादर केलेला आहे. यासह अन्य देशांसाठी आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याची प्रतीक्षा केली जात आहे.

टॅग्स :Aurangabad International Airportऔरंगाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद