शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
2
लग्न होत नसेल, नोकरी मिळत नसेल तर 'राम' नामाचा जप करा; भाजपा खासदारानं संसदेत सांगितला उपाय
3
काश्मीर खोऱ्यात सैन्याला मिळाले १२ हत्तींचे बळ! मिलिटरी ट्रेनने रणगाडे, अवजड शस्त्रास्त्रे नेण्यात यश...
4
प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू अन् दुबई एअरलाइन्सच्या माजी मालकाची पत्नी स्टेशवर सापडली; भीषण अवस्था, व्हिडीओ व्हायरल, नेमकं सत्य काय?
5
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
6
Rakhi Sawant : Video - "माफी मागा, मी तुमचं धोतर खेचलं तर...", नितीश कुमारांवर भडकली राखी सावंत
7
म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! सेबीने एक्सपेन्स रेशोचे नियम बदलले, कमाईवर थेट परिणाम
8
खळबळजनक! घर मालकिणीने भाडं मागितलं, कपलने तिलाच संपवलं; मृतदेहाचे तुकडे केले अन्...
9
परदेश दौऱ्यावर जाताय? ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना 'या' चुका टाळा; अन्यथा खिशाला बसू शकतो मोठा फटका
10
Bomb Threat: न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
11
सुरक्षा दलांची मोठी कामगिरी; छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात 3 नक्षलवादी ठार, शस्त्रसाठा जप्त
12
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
13
५ राजयोगात मार्गशीर्ष अमावास्या २०२५: ९ राशींवर लक्ष्मी कुबेर कृपा, कल्पनेपलीकडे यश-पैसा-लाभ!
14
Creta ला टक्कर देण्यासाठी येतेय Mahindra ची नवी 'मिड-साईज' SUV; असे असेल डिझाईन अन् खासियत
15
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: वर्षातली शेवटची आणि प्रभावशाली रात्र; आठवणीने करा 'हे' ५ उपाय!
16
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
17
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
18
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
19
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
20
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
Daily Top 2Weekly Top 5

दशक्रिया विधीसाठी वापरावे लागतेय टँकरचे पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 18:52 IST

पाणी विकत घेऊन गोदास्नान उरकावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र

- संजय जाधवपैठण (औरंगाबाद ) : दक्षिण काशी पैठण म्हणून मान्यता असलेल्या पैठण नगरीतील गोदावरीचे पात्र आटल्याने दशक्रिया विधी टँकरचे पाणी विकत घेऊन करण्याचा बाका प्रसंग नागरिकांवर ओढवला आहे. गोदावरीच्या झऱ्यातील पाणी विकत घेऊन गोदास्नान उरकावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र गोदामायेच्या पात्रात दिसून येत आहे. गेल्या सहा दशकात सन २०१६ नंतर यंदा गोदेचे पात्र आटल्याने धार्मिक विधी साठी आलेल्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. प्रशासनाने विधीसाठी अल्पदरात टँकर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी या निमित्ताने पुढे आली आहे. 

 भारतीय संस्कृतीमध्ये नद्यांना माता मानले जाते या नद्यांच्या परिसरातच संस्कृतिचा जन्म व विकास झाला दक्षिण भारतात गोदावरीच्या सानिध्यात संस्कृती रूजली असे मानले जाते. पैठण शहरात गोदावरी पित्रमुखी (दक्षिण मुखी) वाहते म्हणून दक्षिणेतील काशी म्हणून पैठण नगरिचे महत्व आजही अबाधित आहे  गोदावरीच्या तीरावर पिंडदान, दशक्रिया विधी, अस्थिविसर्जन, सिंहस्थविधी, कालसर्प शांती, त्रिपिंडी विधी, नियमित होत आले आहेत हे विधी करण्यासाठी  भाविक हजारोच्या संखेने दररोज पैठण शहरात दाखल होतात 

गोदावरी आटली...नाथषष्ठी साठी गोदावरीच्या पात्रातील पाणी सोडून देण्यात आले, कोरड्या झालेल्या पात्रात वारकऱ्यांची सोय करण्यात आली. या नंतर जायकवाडी ची पाणी पातळी जोत्याखाली गेल्याने धरणावरील जलविद्युत प्रकल्प बंद पडला व गोदावरीत जलविद्युत प्रकल्पातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा स्रोत बंद झाला. गेल्या पंधरा दिवसा पासून उन्हाच्या दाहकतेने गोदावरीतील पाणी बाष्पीभवन प्रक्रिये द्वारे उडून गेले व गोदावरी कोरडी झाली. गोदावरी पात्रात पाणी आहे असे समजून विधीसाठी आलेल्या भाविकांना ऐनवेळी टँकर चे पाणी विकत घेउन विधी उरकण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. टँकरच्या पाण्याने पात्रात उभे राहुन केलेल्या स्नानास गोदास्नान मानण्याची वेळ ओढवलीआहे.

६०० रूपये टँकर.....दशक्रिया विधीसाठी आलेल्या नागरिकांना स्नानासाठी टँकर विकत घ्यावे लागत आहे. गोदावरीच्या पात्रात आठ ते दहा टँकर उपलब्ध असून एका टँकरसाठी ६०० रूपये मोजावे लागत आहेत. ऐन वेळी पाण्याच्या टँकरसाठी दाम मोजावे लागत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

गोदावरीच्या झऱ्यातून पाणी पुरवठास्थानिक नागरिकांनी दुष्काळाच्या  परिस्थितीत रोजगार शोधला असून गोदावरीच्या पात्रात खोल झरे खोदुन त्यात पाझरलेले पाणी ते स्वस्तात भाविकांसाठी उपलब्ध करून देत आहेत. ज्या नागरिकांना टँकर घेउन दशक्रिया विधी करणे परवडत नाही अशा नागरिकांना या झऱ्यातील पाण्याचा मोठा दिलासा मिळाला आहे. पाच रूपयात या झऱ्यातून बकेट भर पाणी दिले जात आहे. नाथषष्ठी नंतर ताबडतोब गोदावरी पात्रात पाणी सोडले असते तर आज अशी भिषण परिस्थिती ओढवली नसती अशी चर्चा होत  आहे.

टॅग्स :droughtदुष्काळgodavariगोदावरीAurangabadऔरंगाबादWaterपाणी