शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादची पाणीपुरवठा योजना तपासणार तामिळनाडूचे अभियंते 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 13:13 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्या असून, त्यांच्या तपासणीसाठी तामिळनाडू येथील सेवानिवृत्त अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी येणार आहे

ठळक मुद्देशहरात सध्या तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. शहरात रोज १३५ एमएलडी पाणी येऊनही प्रशासनाकडून नियोजन केले जात नाही, असा आरोप होतो आहे.

औरंगाबाद : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनी जीर्ण झाल्या असून, त्यांच्या तपासणीसाठी तामिळनाडू येथील सेवानिवृत्त अभियंत्यांचे पथक २९ मे रोजी येणार आहे. त्या पथकासोबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंते असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात सध्या तीन दिवसांआड होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यामुळे नागरिकांना पाणी मिळणे अवघड झाले आहे. 

शहरात रोज १३५ एमएलडी पाणी येऊनही प्रशासनाकडून नियोजन केले जात नाही, असा आरोप होतो आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत विद्यमान योजना चालवावी लागणार आहे. ती योजना तपासून आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने आयुक्तांनी तामिळनाडूमधील सेवानिवृत्त अभियंत्यांच्या तज्ज्ञांचे पथक बोलावले आहे. पूर्वी शहरात ९७० कि.मी.ची पाईपलाईन होती. औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीच्या काळात शहरात १०० किमीची पाईपलाईन टाकण्यात आली. १०७० किमीच्या पाईपलाईनवर असलेल्या नळांना सध्या पाणी द्यावे लागले आहे. तसेच हजारो नळ कनेक्शन वाढले आहेत. वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचा दावा पाणीपुवठा विभागाने केला. 

दहा एमएलडी पाणी कमी यावर्षी हर्सूल तलावात पाणीसाठा झाला नाही. हर्सूल तलावातील पाच एमएलडी पाणी काही वॉर्डांना दिले जात होते. हे पाच एमएलडी पाणी कमी झाले, तसेच जायकवाडी धरणातून ५ एमएलडी पाण्याचा उपसा कमी होत आहे. दहा एमएलडी पाणी कमी झाल्याने ताण वाढला आहे. ज्या वसाहतींना हर्सूल तलावाचे पाणी मिळत होते, त्या वसाहतींना शहर पाणीपुरवठा योजनेतून पाणी द्यावे लागत आहे. जायकवाडीतून १५९ एमएलडी पाणी मनपा उपसते, असे जायकवाडी प्रकल्प उपसा योजनेकडे रेकॉर्ड आहे. पंपिंग स्टेशनवरील मीटरदेखील नादुरुस्त होते. ते गुरुवारी दुरुस्त करण्यात आले. 

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीJayakwadi Damजायकवाडी धरण