शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्याकडे झालेल्या निवडणुका सर्वांत निष्पक्ष होत्या”; राहुल गांधींना मित्र पक्षाचा घरचा अहेर
2
डिजिटल अरेस्टवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; देशभरातील सर्व प्रकरणे CBI कडे सोपवली
3
पोर्टेबल लॅब, टॉयलेट, पाणी, अदृश्य सेना...; कुठल्याही देशात जाताना काय काय सोबत घेऊन फिरतात पुतिन?
4
हृदयद्रावक! शेतीसाठी घेतलं १५ लाखांचं कर्ज पण पुराने पीक उद्ध्वस्त, शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळलं
5
Travel : मुंबईजवळची 'ही' ठिकाणं पाहिल्यावर गोवाही विसराल! न्यू इअर सेलिब्रेशनसाठी बेस्ट रोमँटिक डेस्टिनेशन्स
6
मामला 'गंभीर' है...! वारंवार बोलावूनही विजयाच्या जल्लोषात सहभागी झाला नाही कोहली, नेमकं घडलं काय? बघा Video
7
इम्रान खानवर पाकिस्तान सरकारची मोठी कारवाई! न्यूज चॅनेल्सना दिले आदेश, नेमकं काय घडतंय?
8
बाजार विक्रमी पातळीवरून घसरला! सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगाग बंद; ऑटो शेअर्सची मात्र कमाल!
9
“मतदानाला ४८ तास असताना निवडणुका स्थगित करणे अनाकलनीय, निवडणूक आयोग...”; काँग्रेसची टीका
10
VPN वापरताय? थांबा! आताच सावध व्हा; गुगलने दिलीय 'रेड अलर्ट' वॉर्निंग, बँक खातं होऊ शकतं रिकामी
11
“मीरा-भाईंदर मेट्रोचे डोंगरी कारशेड रद्द, लवकर अधिसूचना”; प्रताप सरनाईक यांनी दिली माहिती
12
दत्त जयंती २०२५: तुम्ही ‘श्रीदत्त अथर्वशीर्ष’ म्हणता का? कायमची कृपा होते; पुण्य लाभते!
13
GST दरात कपात होऊनही तिजोरीत वाढ! नोव्हेंबरमध्ये १.७० लाख कोटी रुपये संकलन, पण, 'या' क्षेत्रात घट
14
नवरदेव नेसला साडी अन् नवरीची शेरवानी; आगळ्या-वेगळ्या लग्नाने वेधलं लक्ष, रंगली तुफान चर्चा
15
शेख हसीना पुन्हा बांगलादेशच्या पंतप्रधान होणार? मृत्यूदंडाची शिक्षा असतानाच हालचालींना वेग
16
सामन्यानंतर विराटला एक प्रश्न विचराला गेला, त्यानं बोलता बोलता BCCI अन् गौतम गंभीरवरच निशाणा साधला, स्पष्टच बोलला
17
VIRAL VIDEO : पाकिस्तानी व्लॉगरनं रशियन तरुणींना विचारला एक प्रश्न! त्यांनी जे उत्तर दिलं ऐकून फटक्यात झाला गप्प
18
१००% पर्यंत माफीची संधी! सीटबेल्ट, सिग्नल तोडणे यांसारख्या ट्रॅफिक चलनांवर मिळणार सूट! कसा करायचा अर्ज?
19
छोटा शेअर, मोठा धमाका, ज्यानं ₹१ लाख गुंतवले, त्याचं मूल्य आज झालं ₹८१ लाख; तुमच्याकडे आहे का?
20
विराटचा प्रोटीन बार, रोहितचा डाळ-भात! क्रिकेटर्सचं व्हायरल 'डाएट' सिक्रेट, मॅचमध्ये कशी मिळते एनर्जी?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेनेचे राजेंद्र जंजाळ येण्याच्या चर्चेने छत्रपती संभाजीनगर भाजपातील अनेकांमध्ये अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2025 15:45 IST

चर्चा तर होणारच : न. प. निवडणुकीनंतर शिंदेसेना घेणार आढावा

छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट आणि शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्यात मागील काही महिन्यांपासून नाराजीचे वादळ उठले आहे. हे वादळ आता शिंदेसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोर्टात न. प. निवडणुकीनंतर शमणार आहे. असे असले तरी जंजाळ भाजपमध्ये येण्याच्या चर्चेने भाजपच्या गाेटात अस्वस्थता निर्माण होऊ लागली आहे.

पालकमंत्री शिरसाट यांच्या विरोधात जंजाळ यांनी सार्वजनिकरीत्या टीकास्त्र सोडल्यामुळे पालकमंत्र्यांचा तीळपापड झाला. तुम्हाला जिकडे जायचे तिकडे जा, थांबविले कुणी? असे उत्तर देत, जंजाळ हे शिंदेसेनेतून बाहेर पडले तरी काहीही फरक पडणार नाही, असे संकेत शिरसाट यांनी दिले. आता उपमुख्यमंत्री शिंदे याबाबत काय निर्णय घेतात, याकडे लक्ष आहे.

दरम्यान, जंजाळ हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने भाजपमधील एका गटात अस्वस्थता पसरली आहे. जंजाळ यांच्यासह त्यांचे १० हून अधिक समर्थक पक्षात येणार असल्याची चर्चा आहे. त्या सर्वांना उमेदवारीचा शब्द घेऊनच ते पक्षात प्रवेश करतील, अशी कुजबुज भाजपमधील इच्छुकांमध्ये आहे. तसे झाल्यास मूळ भाजपचे जे इच्छुक पदाधिकारी आहेत, ते भाजपमधून बाहेर पडू शकतात. उमेदवारी न मिळाल्यास दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारीचा बी प्लॅन भाजपमधील इच्छुकांनी तयार करून ठेवण्यावर विचार सुरू केला आहे. तसे झाल्यास भाजपलाही मोठे खिंडार पडेल.

तोडगा नाही निघाला तर... भाजप की उद्धवसेना?पूर्व मतदारसंघ विधानसभा निवडणुकीत जंजाळ यांनी महायुतीसाठी परिश्रम घेतल्यामुळे भाजपमधील काही जण जंजाळ यांच्या बाजूने आहेत. त्यामुळे जंजाळ यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्याबाबत भाजपमधील एक फळी सकारात्मक आहे. त्यामुळेच भाजपमधील एका गटात नाराजीचा सूर आहे. जंजाळ यांचे समर्थक तिन्ही मतदारसंघात आहेत. शिंदेसेनेत काही तोडगा निघाला नाही तर ते इतर पक्षांत समर्थकांसह जाऊ शकतात. दुसरीकडे जंजाळ उद्धवसेनेच्या युवासेनेच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचीदेखील चर्चा आहे. नगरपरिषद निवडणुकीनंतर याप्रकरणी उपमुख्यमंत्री बैठक घेणार असल्याचे शिंदेसेना सूत्रांनी सांगितले.

त्यांना भाजपमध्ये घेण्याबाबत निर्णय नाहीशिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख जंजाळ यांना भाजपमध्ये घेण्याबाबत काहीही निर्णय पक्षपातळीवर झालेला नाही. परंतु जंजाळ यांच्याशी भेटी-गाठी होत आहेत. भाजपला असलेले भविष्य, आमचे वर्क कल्चर, यामुळे अनेकांना पक्षात यायचे आहे.- किशोर शितोळे, शहराध्यक्ष, भाजप

English
हिंदी सारांश
Web Title : Unease in BJP as Shinde Sena's Janjal May Join

Web Summary : Rajendra Janjal's potential BJP entry sparks unrest within the party. Internal factions fear impact on loyal members and candidate selection, creating potential for defections if expectations aren't met.
टॅग्स :Shiv Senaशिवसेनाchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर