शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तलाठी परीक्षेत घोळ; आरोपींकडे २६ हॉलतिकिटे, खोलीत चार ‘मख्खी’ हेडफोन सापडले

By सुमित डोळे | Updated: September 14, 2023 19:54 IST

आरोपी परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक ऑनलाइन हॉलतिकिटे मिळवायचे. त्यातून काहींना संपर्क साधयचे

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परीक्षेत परीक्षार्थींना केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच उत्तरे पुरवणाऱ्या आरोपींकडे आतापर्यंत २६ हॉलतिकिटे आढळली आहेत. शिवाय, आयऑन परीक्षा केंद्राचा पर्यवेक्षक शाहरुख युनूस शेख (२७, रा. भायगाव, वैजापूर) याच्या खोलीवर दोन ‘मख्खी’ (कॉपीसाठी वापरले जाणारे अत्यंत बारीक) हेडफोन आढळून आले. पोलिसांनी ते जप्त केले. मात्र, काही परीक्षार्थींच हॉलतिकिटे मिळवून आरोपीशी स्वत:हून संपर्क साधून उत्तीर्ण करून देण्याची ‘ऑफर' देत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

५ सप्टेंबर रोजी चिकलठाण्यातील आयऑन डिजिटल परीक्षा केंद्राबाहेर राजू नागरे (२९, रा. कातराबाद) याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी रंगेहाथ पकडले. चौकशीत परीक्षा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या मदतीनेच तो परीक्षार्थींना उत्तरे पुरवत होता. रॅकेटचा मास्टरमाईंड व रेकॉर्डवरील गुन्हेगार दत्ता नलावडे पसार झाला. त्याच्यासह पर्यवेक्षक शाहरुख, पवन सुरेश सिरसाट (२६, रा. ब्रिजवाडी) आणि सफाई कर्मचारी बाली रमेश हिवराळे व विकी रोहिदास सोनवणे यांच्या मदतीने ते आयऑन सेंटरमध्ये परीक्षार्थींना उत्तरे पुरवत होते.

खोलीची झाडाझडतीदत्ता व पर्यवेक्षक शाहरुख एकाच खोलीत राहायचे. उपनिरीक्षक आत्माराम घुगे, अंमलदार प्रकाश सोनवणे, संतोष सोनवणे, देवीदास काळे, संतोष गायकवाड यांनी अटकेतील शाहरुखच्या टीव्ही सेंटरच्या खोलीची झाडाझडती घेतली. उत्तरे सांगण्यासाठी आवश्यक पुस्तके, ॲन्सर कीसह २६ तलाठी परीक्षेचे हॉलतिकीट पोलिसांना सापडले. शिवाय, डिजिटल कॉपीसाठीचे हेडफोन, मास्टरकार्डही आढळले.

स्वत:हून ऑफर द्यायचेआरोपी परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अनेक ऑनलाइन हॉलतिकिटे मिळवायचे. त्यातून काहींना संपर्क साधून यासाठी उत्तरे पुरवत असल्याचे शाहरुखने सांगितले. २६ हॉलतिकिटांपैकी काही परीक्षार्थींनीदेखील हे सांगितले. मात्र, हॉलतिकिटे कोण पुरवायचे, हे कळू शकले नाही. दत्ता व पूर्वीच्या कारवाईतील गोमलाडूदेखील अद्याप पसार आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद