शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘हाऊसवाईफ’ पुरे; आता बनायचे तलाठी मॅडम; ‘सेकंड इनिंग’साठी महिलां जिद्दीने परीक्षा केंद्रावर

By संतोष हिरेमठ | Updated: August 23, 2023 14:11 IST

तलाठी परीक्षेच्या माध्यमातून संसारिक जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक महिलांची ‘सेकंड इनिंग’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे.

छत्रपती संभाजीनगर : तलाठी परीक्षेच्या केंद्रावर वेळेवर जाण्याची प्रत्येक परीक्षार्थीची गडबड सुरू होते. त्याच वेळी काही महिला अश्रू अनावर झालेल्या मुलांना पतीकडे, नातेवाइकांकडे सोपवीत होते. ‘बाळ मी लवकरच येते, तुला येताना खाऊ आणते..’ अशी समजूतही घालत त्या केंद्रावर रवाना होत होत्या. प्रत्येकामध्ये एक जिद्द पाहायला मिळत होती, ती म्हणजे ‘हाऊसवाईफ पुरे, आता तलाठी बनायचे’.

तलाठी परीक्षेच्या माध्यमातून संसारिक जबाबदारी सांभाळणाऱ्या अनेक महिलांची ‘सेकंड इनिंग’ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. परीक्षा देणाऱ्यांमध्ये विवाहित महिलांची संख्या लक्षणीय आहे. विवाहबंधनात अडकल्यानंतर कुटुंबाची जबाबदारी, मुलांचा सांभाळ, घराचा सांभाळ यात करिअर करणे मागे पडते. मात्र, मूलबाळ असलेल्या महिलांनी तलाठी परीक्षा दिली. त्यासाठी पतीसह कुटुंबीयांनी पाठिंबा दिला, असे अनेक महिलांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

दोन मुलांना सांभाळून अभ्यासएक ६ वर्षांचा आणि एक ३ वर्षांचा मुलगा आहे. दोघांना सांभाळत तलाठी परीक्षेचा अभ्यास केला. घरातील सर्व काम करून अभ्यासासाठी वेळ काढला. यापूर्वीही परीक्षा दिलेली आहे. यावेळी यश मिळेल, अशी अपेक्षा आहे.- तारा उसरे, जरंडी

रोज ३ तास अभ्यासअडीच वर्षांचा मुलगा आहे. तलाठीच्या परीक्षेसाठी रोज ३ तास अभ्यासासाठी वेळ दिला. त्यासाठी रेफरन्स बुकची मदत घेतली. कोरोनानंतर पहिलीच मोठी भरती परीक्षा आहे. परीक्षेसाठी पुण्याहून छत्रपती संभाजीनगरला आले.- शीतल काटे, पुणे

तिच्या शिक्षणाचे चीज व्हावेपत्नी मिलन जाधव हिने घेतलेल्या शिक्षणाचे चीज व्हावे, यासाठी तिला या परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले. ४ वर्षांचा मुलगा आहे. सर्व सांभाळून तिने परीक्षेची तयारी केली. स्पर्धा परीक्षा देणे हे पुरुषांपेक्षा महिलांना अवघड असते. कारण त्यांना संसारही सांभाळावा लागतो.- गणेश जाधव, छत्रपती संभाजीनगर

टॅग्स :examपरीक्षाAurangabadऔरंगाबादStudentविद्यार्थीWomenमहिला