शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
2
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
3
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
4
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
5
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
6
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
7
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
8
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
9
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
10
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
11
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
'मिसेस मुख्यमंत्री' GOAT मेस्सीला भेटल्या, खास PHOTO पोस्ट करून अमृता फडणवीसांनी लिहिले...
13
पंतप्रधान मोदी, रशियाचे पुतिन यांच्या खास मैफलीत झंकारली नागपूरकर लावण्य अंबादे यांची सतार
14
मीरा भाईंदर महापालिका, परिवहन ठेकेदाराच्या वादात बससेवा डबघाईला; सामान्य नागरिकांना मनस्ताप
15
महिनाभर आधी झालेलं प्रेयसीचं लग्न, पहिल्या प्रियकराने नवऱ्याला भेटायला बोलवलं अन् संपवलं...
16
VIDEO: आधी गणपती बाप्पाचा जयजयकार, नंतर CM देवेंद्र फडणवीसांनी मेस्सीला केलं एक 'प्रॉमिस'
17
U19 Asia Cup, IND vs PAK : टीम इंडियाने उडवला पाकचा धुव्वा; हायव्होल्टेज मॅचमध्ये काय घडलं?
18
"राहुल गांधींचे सैनिक बणून मोदींविरोधात...!" रामलीला मैदानावरून रेवंत रेड्डीची गर्जना
19
IND vs SA : पांड्याच्या 'सेंच्युरी'सह चक्रवर्तीची 'फिफ्टी'! शेवटच्या षटकात बर्थडे बॉयचा जलवा अन्....
20
VIDEO : क्रिकेटचा 'देव' सचिन आणि फुटबॉलचा 'जादूगार' मेस्सीची ग्रेट भेट; खास गिफ्ट अन् बरंच काही
Daily Top 2Weekly Top 5

झोपेसाठी सर्रास गोळ्या घेताय? रक्तदाब, हृदयरोगाचा होऊ शकतो धोका !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 17:13 IST

दिवसभर संगणक आणि मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे लावल्याने झोपेचे चक्र बिघडले आहे

छत्रपती संभाजीनगर : वाढता ताणतणाव, बदलती जीवनशैली आणि मोबाइलच्या विळख्यात अडकलेल्या दिनचर्येमुळे अनेकांना झोपेच्या समस्या भेडसावत आहेत. झोप येत नाही, म्हणून अनेक जण सर्रास झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र, या गोळ्यांचे डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय सेवन केल्याने रक्तदाब, हृदयरोगाची शक्यता बळावते, असे तज्ज्ञांनी म्हटले.

मोबाइल, टीव्हीने उडाली झोपदिवसभर संगणक आणि मोबाइलच्या स्क्रीनवर डोळे लावल्याने झोपेचे चक्र बिघडते आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो. रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी लवकर उठण्याची वेळ सांभाळण्याच्या प्रयत्नात शरीर थकल्यासारखे वाटते. झोप पूर्ण होत नाही, त्यामुळे थकवा आणि चिडचिड वाढते.

डोक्यात डिग्री, ‘पॅकेज’ची गणितं!महाविद्यालयीन विद्यार्थी परीक्षा आणि भविष्यातील करिअरच्या चिंता करत रात्रभर अभ्यासात व्यग्र राहतात, तर नोकरदार वर्ग सतत उच्च वेतन, पदोन्नती, कामाच्या तणावाचा सतत विचार करत असतात. डोक्यात डिग्री आणि पगाराच्या आकड्यांची गणितं सुरू असल्यानेही झोपेवर परिणाम होते.

अपुरी झोप, तणावामुळे व्यसनाधीनताअपुरी झोप आणि वाढता तणाव यामुळे अनेक जण मद्यपान, सिगारेट आणि झोपेच्या गोळ्यांसारख्या गोष्टींमध्ये आधार शोधू लागतात. त्याचा आरोग्यावर परिणाम होतो.

डॉक्टर, झोप येत नाहीय; औषध लिहून द्या!‘डॉक्टर, झोप येत नाहीय; काही औषध लिहून द्या,’ असा आग्रह अनेक जण स्वत:हूनच डाॅक्टरांकडे धरतात. सुरुवातीला या गोळ्या तणावमुक्त झोप देतात. मात्र, त्यांचा दीर्घकालीन परिणाम शरीरावर होऊ शकतो.

झोपेच्या गोळ्यांमुळे रक्तदाबावर परिणामअनेक संशोधनांनुसार झोपेच्या गोळ्यांचे नियमित सेवन केल्यास रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. या गोळ्यांमुळे मेंदूवरील नैसर्गिक न्यूरोट्रान्समीटर क्रियाशीलता प्रभावित होते. परिणामी, हृदयाच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

हृदयरोगाची शक्यता; मेंदूवर परिणामझोपेच्या गोळ्यांचा दीर्घकाळ वापर केल्यास हृदयरोगाची शक्यता वाढते. हृदयाचे ठोके अनियमित होणे, रक्तदाब वाढणे आणि मानसिक क्षमता कमी होणे यासारखे दुष्परिणाम दिसून येतात. या औषधांचा प्रभाव मेंदूवरही पडतो. स्मरणशक्ती कमी होणे, सतत गुंगी येणे, मानसिक आरोग्यावर परिणाम होणे, अशी स्थिती निर्माण होते.

तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय गोळ्या नकोझोपेच्या अडचणी शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही समस्यांशी निगडित आहेत. झोपेच्या समस्या मानसिक आरोग्याच्या स्थितीत योगदान देऊ शकतात किंवा वाढवू शकतात आणि इतर मानसिक आरोग्य स्थितींचे लक्षण असू शकतात. झोपेच्या विकारांवर औषधोपचार खरच महत्त्वाचे आहेत; पण मानसोपचारतज्ज्ञांचा सल्ला घेऊनच ती घेतली पाहिजे.- डाॅ. मेराज कादरी, मनोविकारतज्ज्ञ

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरHealthआरोग्य