शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एक गोळी घेतली की, डोकं कसं तड तड तड; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची सर्रास विक्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 12:56 IST

डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गल्लीबोळातील औषध विक्रेत्यांकडून तरुणांना झोपेच्या गोळ्यांचा ‘डोस’

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : ‘एक घोट घेतला की डोकं कसं तड तड...’ हे गाणं सध्या अनेकांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे; परंतु रोज एक घोट म्हणजे मद्य खरेदी करून पिणे खिशाला परवडत नाही म्हणून काहींकडून नशेसाठी थेट झोपेच्या गोळ्यांचा वापर केला जात आहे. डाॅक्टरांची चिठ्ठी असेल तरच औषध विक्रेत्यांनी झोपेच्या गोळ्या विकणे बंधनकारक आहे. मात्र, डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गल्लीबोळातील औषध विक्रेत्यांकडून बटण, ऑरेंज, कीटकॅट नावाखाली झोपेच्या गोळ्यांचा ‘डोस’ देण्याचा उद्योग सुरू असल्याचे ‘लोकमत’ने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून समोर आले आहे.

या गोळ्या खाल्ल्यानंतर इतर व्यसन केल्यानंतर येतो तसा कोणताही वास येत नाही. त्यामुळे सर्वसामान्य घरांतील मुलांबरोबर उच्च स्तरातील मुलेही गोळ्यांच्या व्यसनाला बळी पडत आहेत. काहीजण चौपट पैसे घेऊन गोळ्यांची विक्री करीत आहेत.

बटणनंतर आता कीटकॅट नावझोपेच्या काही ‘हायपाॅवर’ गोळ्या बटण नावाने छुप्या पद्धतीने विकल्या जात; परंतु बटण हे नाव सर्वांना माहिती झाले, त्यामुळे आता ऑरेंज, कीटकॅटच्या नावाने या गोळ्या चालतात.

या भागात ‘स्टिंग’शहरातील घाटी परिसर, जवाहर काॅलनी, त्रिमूर्ती चौक, आकाशवाणी चौक, सेव्हन हिल रोड, जय भवानीनगर, पुंडलिकनगर, शिवाजीनगर, देवळाई रोडसह शहरातील ६५ औषध दुकानांवर झोपेच्या गोळ्यांची मागणी करण्यात आली.

काय आढळले?काही औषध विक्रेत्यांनी गोळ्या नसल्याचे, तसेच डाॅक्टरांकडून चिठ्ठी आणण्यास सांगितले. तर काहीजण सरळ गोळ्या देऊन मोकळे झाले. मागितलेल्या गोळ्यांपेक्षा अधिक इफेक्टिव्ह गोळ्या असल्याचे सांगत एका औषध विक्रेत्याने संपूर्ण स्ट्रीपच दिली. काहींनी केवळ एक गोळी दिली. दोन विक्रेत्यांनी तीन गोळ्या दिल्या.

बहुतांश विक्रेत्यांकडून नियमांचे पालनडाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषध विक्रेत्यांनी झोपेच्या गोळ्या देता कामा नये. बहुतांश विक्रेते याचे पालन करतात. काहीजण त्याचे पालन करत नसतील. त्यांनीही नियमाचे पालन करावे. अनेक विक्रेते झोपेच्या गोळ्या ठेवतही नाहीत.- विनोद लोहाडे, सचिव, औरंगाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन

नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईऔषध दुकानांची नियमितपणे तपासणी केली जाते. डाॅक्टरांची चिठ्ठी असल्याशिवाय झोपेच्या गोळ्या देता कामा नये. याकडे कोणी दुर्लक्ष करीत असेल तर कारवाई केली जाईल.- गिरीश हुकरे, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन (औषधे)---------

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDrugsअमली पदार्थCrime Newsगुन्हेगारी