शहरं
Join us  
Trending Stories
1
चौफेर टीका, भाजपाची नाचक्की, अखेरीस स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याने दिला राजीनामा
2
‘सत्तेत राहून एकमेकावर आरोप कसले करतात? हिंमत असेल तर सत्तेतून बाहेर पडा’, काँग्रेसचं भाजपा आणि अजित पवारांना आव्हान   
3
भारत, चीन, ब्राझील आणि सौदी अरेबिया अमेरिकेतून काढताहेत पैसे, जाणून घ्या कारण
4
बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप
5
Rohini Acharya : "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट
6
'तुषार आपटेचं भर चौकात मुंडके छाटा', स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्ती करताच कालीचरण महाराज कडाडले
7
'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट
8
नितीश कुमार यांनी ज्येष्ठ नेत्याला दिला पक्षातून नारळ, जेडीयू म्हणाली, आता आमचा त्यांच्याशी काहीही संबंध नाही
9
Travel : गोव्याचे 'हे' ५ नाईट मार्केट्स एकदातरी बघायलाच हवे! शॉपिंग प्रेमी अन् पर्यटकांसाठी जणू स्वर्गच
10
"३ वर्ष काम बंद, नवीन घराचा हफ्ता द्यायला पैसे नव्हते, त्यावेळी..."; अमृता खानविलकरने सांगितला स्वामी समर्थांचा विलक्षण अनुभव
11
भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या
12
IND vs NZ ODI Record: किंग कोहलीकडे विक्रमादित्य सचिन तेंडुलकरला मागे टाकत नवा इतिहास रचण्याची संधी
13
Reliance Jio IPO कधी खुला होणार, GMP ९३ रुपयांवर; काय आहे असेल प्राईज ब्रँड?
14
भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज
15
२५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार
16
बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट
17
Numerology: ११ जानेवारीला उघडणार ब्रह्मांडाचे दार; एक तीव्र इच्छा दिवसभरात दोनदा व्यक्त करण्याची संधी!
18
संशयाने चार मुलांना केले अनाथ ! दगडावर ठेचून पत्नीचा खून करून पतीने केली आत्महत्या; ८० वर्षीय आजोबांवर आली जबाबदारी
19
WPL 2026 Double Header UP vs GG And MI vs DC Live Streaming : 'डबल हेडर'चा थरार! जेमिमासाठी MI विरुद्धची मॅच ठरेल खास; कारण...
20
२०२६ संपूर्ण वर्ष ५ राशींना साडेसाती, ‘हे’ उपाय करा; शनि काही बिघडवणार नाही, उलट कृपाच करेल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा, विधानसभेतील पराभवाचा वचपा मनपा निवडणुकीत काढा; असदुद्दीन ओवेसींचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 11:56 IST

इम्तियाज जलील यांच्या वाहनांवर हल्ला केला, हे कदापि सहन केले जाणार नाही. माझ्या वाहनावर सहा गोळ्या झाडल्या होत्या, त्यानंतरही मी कोणाला घाबरत नाही.

छत्रपती संभाजीनगर : मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत एमआयएमच्या उमेदवारांचा पराभव करण्यात आला. या पराभवाचा वचपा महापालिका निवडणुकीत काढा. ‘मजलीस’ला विरोध करणाऱ्यांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन एमआयएम पक्षाचे प्रमुख तथा खा. असदुद्दीन ओवेसी यांनी बुधवारी रात्री आमखास मैदान येथील जाहीर सभेत केले.

जाहीर सभेसाठी ओवेसी ७:३० वाजताच सभास्थळी दाखल झाले होते. ९:१५ वाजता त्यांच्या भाषणाला सुरूवात झाली. प्रारंभी त्यांनी मागील १० वर्षांमध्ये पक्षाने केलेल्या विकासकामांची यादीच वाचून दाखविली. विशेष बाब म्हणजे नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गंत ५२ जलकुंभ उभारण्यात एमआयएमचा मोठा वाटा असल्याचा दावा केला. त्यानंतर ओवेसी यांनी हळूहळू आपल्या शैलीत एमआयएमचा विरोध करणाऱ्यांचा खरपूस समाचार घ्यायला सुरुवात केली. तिकीट न मिळालेल्या नाराजांच्या नावांचा वारंवार उल्लेख करीत त्यांची नाराजी दूर झाल्याचे त्यांनी नमूद केले. मागील लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील, बिहारचे अख्तर उल इमान निवडून आले असते तर लोकसभेत वक्फ बिलाला कडाडून विरोध केला असता. हा काळा कायदा मंजूर हाेऊच दिला नसता, असे सांगत त्यांनी निवडणुकांमधील पराभवाचा बदला घ्या, विरोधकांचे डिपॉझिट जप्त करा, असे आवाहन केले. 

इम्तियाज जलील यांच्या वाहनांवर हल्ला केला, हे कदापि सहन केले जाणार नाही. माझ्या वाहनावर सहा गोळ्या झाडल्या होत्या, त्यानंतरही मी कोणाला घाबरत नाही. हा खेळ खेळणारे पावसाळ्यातील बेडूक आहेत. आमच्यासमोर अजून तुम्ही खूप लहान आहात, बच्चे आहात, असा उल्लेखही हल्लेखोरांचा केला. या घटनेवर ‘इस चमन को सैरा नहीं होने दूँगा....’ हा शेर त्यांनी सादर केला. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांचे आहे, त्यांनी अशा लोकांना ‘दुबई’ येथे पाठविले पाहिजे. नेहमीप्रमाणे पंतप्रधान मोदी यांच्यावरही त्यांनी प्रखर टीका केली. आम खास मैदानावर रात्री मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात होता. उपायुक्त पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त रत्नाकर नवले यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी मैदानावर तळ ठोकून होते.

त्यांचे तर दोन नंबरचे धंदेजिन्सी येथे बुधवारी दुपारी हल्ला करणाऱ्यांचे धंदे काय आहेत, तर दोन नंबरचे, हे आम्ही बाहेर काढले तर महागात पडेल. आम्हाला कोणी घाबरविण्याचा प्रयत्न करू नये. पोलिसांनी त्यांचे काम करावे. हल्ले करणाऱ्यांच्या वाहनांमध्ये पेट्रोल कोण टाकते आहे, हे माहीत असल्याचे इम्तियाज जलील म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Avenge defeat in corporation elections: Asaduddin Owaisi's call

Web Summary : Owaisi urged supporters to avenge past defeats in corporation elections. He highlighted MIM's development work, criticized opponents, and addressed internal dissent. He condemned the attack on Imtiyaz Jaleel's vehicle and criticized PM Modi. He also alluded to knowing the illegal activities of the attackers.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६Imtiaz Jalilइम्तियाज जलीलAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी