शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

सरसकट दुष्काळ जाहीर करून युद्धपातळीवर उपाययोजना करा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 19:53 IST

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कुठल्याही प्रक्रियांमध्ये न अडकता सरसकट दुष्काळ जाहीर करून युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत

औरंगाबाद : परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, कुठल्याही प्रक्रियांमध्ये न अडकता सरसकट दुष्काळ जाहीर करून पशुधन व फळबागा वाचविण्यासाठी, तसेच पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी शासनाने युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या पाहिजेत, अशी आग्रही मागणी आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व माजी कृषिमंत्री शरद पवार यांनी केली.

चिखली येथे भारत बोंद्रे यांच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहून शरद पवार हे औरंगाबादला आले होते. तिकडे जाण्यासाठी रात्री मुक्कामही औरंगाबादेतच केला होता. शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळावर पत्रकारांशी विस्ताराने चर्चा केली व सध्या माझे याच प्रश्नाला सर्वाधिक प्राधान्य आहे, असे ते म्हणाले. 

सत्ताधारी अचाट कल्पना मांडत असतात. परदेशातून कडबा आणायला माझी काहीच हरकत नाही; पण यात वेळ किती जाईल? असा सवाल उपस्थित करून ‘आपण सर्वज्ञ आहात; पण जाणकारांचा सल्ला जरा घेत चला ना,’ असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. 

‘चाइल्डिश’ म्हणणार नाही कारण... पवार यांनी सांगितले की, आम्ही सत्तेत असताना दुष्काळ की दुष्काळसदृश, अशा शब्दांमध्ये अडकून न पडता तात्काळ निर्णय घेऊन अंमलबजावणी करीत होतो. निर्णय घ्यायला उशीर लावत नव्हतो आणि शब्दांचा खेळ करीत बसण्याची ही वेळ नाही. सध्या लहान मुलांसारखे चालू आहे. याला मी ‘चाइल्डिश’ म्हणणार नाही. कारण मुख्यमंत्रीपदाची किंमत कमी होऊ नये,’ असाही टोला लगावायला पवार विसरले नाहीत.

साखर उत्पादनासाठी बीटची शेती फायदेशीर ऊस उत्पादनासाठी पाणी आणि कालावधीही जास्त लागतो. हे लक्षात घेऊन मागच्याच आठवड्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटतर्फे आम्ही फ्रान्स, नेदरलॅण्ड, स्पेन आणि बेल्जियम या देशांना भेटी देऊन आलो. तेथील बीटची शेती पाहिली. ती परवडणारी वाटली. सहा महिन्यांत बीट येते व तुलनेने पाणीही कमी लागते. शिवाय  बीटमध्ये साखरेचे प्रमाणही १३ टक्केआहे. बीटपासून इथेनॉलही तयार करता येतो. हे फायदे लक्षात घेता येत्या महिनाभरात बीट शेतीचा अंतिम निर्णय आम्ही घेणार असल्याचे शरद पवार यांनी जाहीर केले. 

प्यायच्या पाण्यात वाद नको नगर-नाशिकच्या धरणांमधील पाणी जायकवाडीत सोडण्यावरून सध्या वाद सुरू आहे. राजकारण रंगले आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधताच शरद पवार उत्तरले, हे राजकारण नाही. तिकडच्या मंडळींना आपले पाणी आपल्याकडेच राहावे असे वाटू शकते; पण आज  मराठवाड्याची परिस्थिती गंभीर आहे. प्यायला पाणी आताच उपलब्ध नाही. आणखी आठ महिने जायचे आहेत. अशावेळी राजकारण व वाद नको. हे मी नगर- नाशिककडे माझे ऐकणारी जी मंडळी असतील, त्यांना समजावून सांगणार आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारdroughtदुष्काळChief Ministerमुख्यमंत्री