शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

किडनीला जपा, नाही तर दाता शोधून ठेवा ! मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 11:30 IST

जागतिक मूत्रपिंड दिन: औरंगाबादेत महिन्याला चार हजार डायलिसिस; मराठवाड्यात ३०० जणांना हवी किडनी

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : मूत्रपिंड (किडनी) हा मानवी शरीरातील एक महत्त्वपूर्ण अवयव आहे. ही किडनी खराब झाली तर काय यातना होतात, हे रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीयच सांगू शकतात. औरंगाबादेत महिन्याला चार हजार रुग्णांचे डायलिसिस होतात. मराठवाड्यात ३०० रुग्ण किडनी मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

जागतिक मूत्रपिंड दिवस हा जगभर मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. वैद्यकीय तज्ज्ञ किडनीची तुलना सुपर काॅम्प्युटरशी करतात. कारण किडनीची रचना खूप अनोखी आणि कार्य गुंतागुंतीचे आहे. किडनी शरीरातील रक्त साफ करून मूत्राची निर्मिती करते. शरीरातील पाणी, आम्ल, क्षार, अन्य घटक आणि शरीरातून उत्सर्जित होणाऱ्या पदार्थांचे संतुलन बिघडले तर धोकादायक ठरू शकते. डायलिसिस करणाऱ्या क्राॅनिक किडनी फेल्युअरच्या ४० टक्के रुग्णांची किडनी खराब होण्याचे कारण मधुमेह असतो, असे तज्ज्ञांनी सांगितले.

किडनी निरोगी राहण्यासाठी...-रोज तीन लिटरहून अधिक (१० ते १२ ग्लास) पाणी प्यावे.- नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रणात ठेवणे.- ४० वर्षांनंतर जेवणात मिठाचे प्रमाण कमी ठेवणे.-धूम्रपान, तंबाखू, गुटखा आणि मद्याचे व्यसन टाळावे.- डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय अनावश्यक औषधी घेऊ नयेत.- मधुमेह, उच्च रक्तदाब असलेल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीने वयाच्या २० वर्षांनंतर आरोग्य तपासणी करणे.- वयाच्या चाळिशीनंतर कोणताही त्रास नसला तरी नियमितपणे आरोग्य तपासणी करणे.

दररोज एकावर प्रत्यारोपणमधुमेह, उच्च रक्तदाब, अतिस्थूल अशा अनेक कारणांनी किडनी विकाराला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या आजारांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे. दररोज एकावर किडनी प्रत्यारोपणाची वेळ येत आहे. मराठवाड्यात तीनशे रुग्णांना किडनी मिळण्याची प्रतीक्षा आहे.- डाॅ. सुधीर कुलकर्णी, विभागीय अवयव प्रत्यारोपण समन्वय समिती

...तर धोका टाळणे शक्यभारतासह जगभरात किडनी फेल्युअरचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणाबाहेरील शुगर आहे. त्यामुळे जर शुगर नियंत्रणात ठेवली तर किडनी फेल्युअरचा धोका टाळणे शक्य आहे.- डाॅ. नीलेश लोमटे, मधुमेह आणि आंतरग्रंथी तज्ज्ञ

वेळीच उपचार करावेतकिडनीचे अनेक आजार खूप गंभीर असतात. त्यावर योग्य वेळी उपचार केले नाहीत तर काहीच फायदा होत नाही. डायलिसिस, किडनी प्रत्यारोपणासारखे उपचार प्रचंड महाग आहेत. त्यामुळे आरोग्याकडे, आजारांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे.- डाॅ. वाजेद मोगल, किडनी विकारतज्ज्ञ

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHealthआरोग्य