शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

राज ठाकरेंच्या सभेच्या परवानगी अर्जाची टेबलवारी सुरु; विरोधामुळे राजकीय वातावरण तापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 12:20 IST

Raj Thackeray: मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे की, कुणाच्याही निवेदनाला आम्ही भीक घालीत नाही. सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे.

औरंगाबाद : राज ठाकरे (Raj Thackeray ) यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेच्या परवानगीसाठी जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी केलेल्या अर्जाची टेबलवारी सुरू आहे. परवानगीसाठी अद्याप पोलीस प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही. पोलीस आयुक्तालयात दिलेला अर्ज विशेष शाखेमार्फत स्थानिक शाखेकडे जातो. त्यानंतर परवानगीच्या अनुषंगाने सभा ज्या हद्दीत आहे, तेथील पोलीस ठाण्याच्या अभिप्रायासह परवानगी दिली जाते. अर्जाची अशी टेबलवारी असते. सभेला १० दिवसांचा कालावधी बाकी आहे. त्यामुळे परवानगी देण्याबाबत लगेच काही निर्णय होईल, असे चित्र नाही.

मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी १ मे रोजी सायंंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या नियाेजित सभेच्या अनुषंगाने मराठवाडा सांस्कृतिक मंडळाची पाहणी केली. या सगळ्या घडामोडींमध्ये सभेला विरोध करणाऱ्या निवेदनांची जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाकडे आवक वाढली आहे. ठाकरेंची सभा आणि वाढता विरोध यामुळे प्रशासनाची कोंडी होत असून, पोलीस प्रशासनाने सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही. मंगळवारी चार ते पाच संघटनांनी निवेदने देऊन सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी पोलीस व जिल्हा प्रशासनाकडे केली. त्यानंतर बुधवारी अ. भा. सेनेचे महेंद्र साळवे, सतीश म्हस्के यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना निवेदन देऊन सामाजिक शांतता अबाधित राहण्यासाठी सभेला परवानगी देऊ नये, अशी मागणी केली आहे.

सभेला परवानगी मिळणारचमनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी सांगितले आहे की, कुणाच्याही निवेदनाला आम्ही भीक घालीत नाही. सभेला पोलिसांची परवानगी मिळणार आहे. सामाजिक शांतताभंग होईल, असा सभेचा उद्देश नसून ही जागरण सभा आहे. सभेला लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली आहे. सभेमुळे कुठलाही सामाजिक सलोखा बिघडणार नाही, असा दावा धोत्रे यांनी केला.

सभेला परवानगी दिल्यास रस्त्यावर उतरूराज ठाकरे यांच्या १ मे रोजी होणाऱ्या सभेला परवानगी दिल्यास भारिप तथा वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करील, असा इशारा नेते सुमित भुईगळ यांनी दिला आहे.

शहरातील राजकीय वातावरण तापले१ मे रोजी औरंगाबादेत सभा घेण्याचे राज ठाकरे यांनी जाहीर करताच शहरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. लहान-मोठ्या पक्ष, संघटनांनी सभेबाबत विरोधाचे हत्यार उपसले आहे. पुढील १० दिवसांत आणखी कशा पद्धतीने राजकारण तापेल, हे आत्ताच सांगता येणार नाही. भाजपकडून सभेबाबत अद्याप काही प्रतिक्रिया नाही, तर शिवसेनेने सभेबाबत सोशल वॉर पेटविले आहे. मनसेने मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील मतदारसंघनिहाय पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. तसेच काही संघटनांनी सभेला पाठिंबा दिल्याचे पत्रही मनसे नेत्यांना बुधवारी दिले. आगामी काही दिवसांत सभेवरून होर्डिंग्ज वॉर भडकण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादRaj Thackerayराज ठाकरेMNSमनसे