शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
4
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
5
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
6
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
7
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
8
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
9
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
10
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
11
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
12
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
13
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
14
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
15
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
16
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
17
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
18
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
19
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
20
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप

यंत्रणा ढेपाळली, प्राप्त अर्जांचा ताळमेळ लागेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 1:09 AM

जिल्ह्यातील २३० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक विभागाचे काम पाहणारी यंत्रणा ढेपाळली.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील २३० ग्रामपंचायतींच्या सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी निवडणूक विभागाचे काम पाहणारी यंत्रणा ढेपाळली. कोणत्या तालुक्यात किती अर्ज आॅनलाइन अर्ज प्राप्त झाले, याची आकडेवारी जुळविण्याचे काम शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत सुरूच होते. दरम्यान, शेवटचे वृत्त लिहिपर्यंत भोकरदन तालुक्यातील दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.निवडणूक अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे जालना, भोकरदन, परतूर, अंबड, जाफराबाद, बदनापूर, घनसावंगी येथील तहसील कार्यालयांत सकाळपासून इच्छुकांची गर्दी पाहायला मिळाली. तसेच आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी महा ई-सेवा केंद्र्रांवर तोबा गर्दी उसळली. आॅनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत पुन्हा तहसील कार्यालयात जमा करावी लागत असल्यामुळे तहसीलमध्ये कार्यालयात संबंधित अधिकारी व कर्मचाºयांची दमछाक झाली. जालना तालुक्यातील २९ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी १७९ तर सदस्यपदासाठी ६१५ अर्ज प्राप्त झाले आहेत. मंठा तालुक्यातील ३५ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाकरिता १३५, तर सदस्यपदाच्या २६१ जागांसाठी ५६८ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती निवडणूक विभागाचे किशोर तायडे यांनी दिली. परतूर तालुक्यात सरपंचपदाच्या ४१ जागांसाठी १९७ तर सदस्यपदासाठी ८९९ अर्ज प्राप्त झाल्याचे तहसीलदार ज्ञानेश्वर फुपाटे यांनी सांगितले. अंबडमधील ३८ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदाकरिता एकूण २०७ तर सदस्यपदासाठी ९९२ अर्ज प्राप्त झाले आहेत. बदनापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी सरपंचपदासाठी २७ तर सदस्यपदांसाठी १०६ अर्ज प्राप्त झाले आहेत. घनसावंगी व जाफराबाद तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी प्राप्त अर्जांची माहिती उशिरापर्यंत मिळू शकली नाही. दरम्यान, ज्या उमेदवारांनी चिन्हासाठी पसंती क्रमांक दिले नाहीत, त्यांना छाननी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पसंती क्रमांक देता येणार आहेत. ज्या उमेदवार प्रथम येतील त्यांना निवडणूक आयोगाच्या निकषानुसार चिन्ह वाटप करण्यात येईल, असे जालन्याचे तहसीलदार विपिन पाटील यांनी सांगितले.