वर्धमान गणेश प्रतिष्ठान राबविणार स्वीट ड्रीम प्रोजेक्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:05 AM2021-05-16T04:05:41+5:302021-05-16T04:05:41+5:30

या संस्थेने यासाठी ‘स्वीट ड्रीम प्रोजेक्ट’ या नावाने प्रकल्प हाती घेतला आहे. वर्धमान गणेश प्रतिष्ठान ही संस्था जालना जिल्ह्यातील ...

Sweet Dream Project to be implemented by Vardhman Ganesh Pratishthan | वर्धमान गणेश प्रतिष्ठान राबविणार स्वीट ड्रीम प्रोजेक्ट

वर्धमान गणेश प्रतिष्ठान राबविणार स्वीट ड्रीम प्रोजेक्ट

googlenewsNext

या संस्थेने यासाठी ‘स्वीट ड्रीम प्रोजेक्ट’ या नावाने प्रकल्प हाती घेतला आहे. वर्धमान गणेश प्रतिष्ठान ही संस्था जालना जिल्ह्यातील गोकुळवाडी येथे आहे. नवकार आराधिका डॉ. प्रतिभाकंवरजी म.सा., प्रफ्फुलकंवरजी म.सा., सिद्धीसुधाजी म.सा. यांच्या प्रेरणेने ही संस्था कार्य करीत आहे. औरंगाबाद-जालना हायवेवर असलेल्या या संस्थेकडे पाच एकर जागा आहे. या ठिकाणी वृद्ध साधुसंतांसाठी व्यवस्था करण्यात येणार आहे.

तसेच शाळा, कॉलेज, ध्यान केंद्र, योगा केंद्र, वाचनालयही बनवण्यात येणार आहे. कोरोना काळात अनेकांच्या डोक्यावरचे छत्र हरवले आहे. अनेकांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली आहे. या पार्श्वभूमीवर या संस्थेने क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. देशातील सर्व अनाथ मुलांना या ठिकाणी निवास व शिक्षण मोफत दिले जाणार आहे. सहा वर्षांवरील सर्व मुलामुलींचा या ठिकाणी सांभाळ केला जाणार आहे.

या संस्थेचे अध्यक्ष अशोक कोठारी, उपाध्यक्ष ॲड. सुनील कोचेटा, सचिव राजेंद्र पोकरणा, सदस्य सुभाष मुथा, पारस बाफना, प्रकाश बोथरा यांच्यासह संस्थेचे सर्व विश्वस्त या प्रकल्पासाठी प्रयत्नशील आहेत.

चौकट

आज कोरोनामुळे परिस्थिती अतिशय बिकट बनली आहे. अनेकांचे पालक कोरोनामध्ये गेल्यामुळे त्यांची मुले अनाथ झाली आहेत. त्यांना सांभाळणारे कोणी नाही म्हणून मी वर्धमान गणेश प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकारिणीशी बोलून हा स्वीट ड्रीम प्रोजेक्ट सुरू केला आहे

जैन साध्वी डॉ. प्रतिभाकंवरजी म.सा

Web Title: Sweet Dream Project to be implemented by Vardhman Ganesh Pratishthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.