शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लड्डा दरोडा प्रकरणातील सोने आराेपींनी नांदेडच्या व्यक्तीकडे ठेवल्याचा संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 18:29 IST

तपास आंबेजोगाई, नांदेडच्या दिशेने, पोलिसांचे दोन पथके रवाना; सर्व आरोपींच्या घरांची पुन्हा एकदा कसून झाडाझडती

छत्रपती संभाजीनगर : बजाजनगरमधील संतोष लड्डा यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील काही सोने आरोपींनी नांदेडच्या एका व्यक्तीकडे ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरून सुरेश ऊर्फ सूर्यकांत रामकिसन गंगणे याला सोबत घेत पथके नांदेड व आंबेजोगाईच्या दिशेने तपासासाठी रवाना झाली. दरम्यान, आरोपी सुरेशची पत्नी बबिता गंगणे हिची न्यायालयाने मंगळवारी हर्सूल कारागृहात रवानगी केली.

लड्डा यांच्या घरावर १५ मे रोजी पडलेल्या दरोड्यात लुटलेल्या सोन्याच्या दागिन्यांविषयी पोलिस अद्यापही संभ्रमात आहेत. अटकेतील १२ आरोपींच्या चौकशीत अपेक्षित माहितीच पोलिसांना मिळालेली नाही. एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकरच्या जवळील व्यक्तींची लवकरच चौकशी केली जाणार असल्याने त्यातून ठोस हाती लागण्याची शक्यता पोलिसांना आहे. दरम्यान, दरोड्यानंतर गंगणेने बहुतांश सोने आठ लाख रुपयांत परिचयातीलच सराफा व्यावसायिकाला विकले. ती रक्कम पोलिसांनी जप्त केली. त्या व्यतिरिक्त गंगणेच्या माध्यमातून अमोलने नांदेडमधील एका व्यक्तीला कॉल करून सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी दिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोन पथके तत्काळ त्या दिशेने रवाना झाली.

अखेर पावत्या सादरलुटलेल्या दागिन्यांच्या पावत्या सादर करण्यासाठी लड्डा यांनी वेळ मागितला होता. मंगळवारी दुपारी पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी लड्डा यांच्याकडे दरोड्याच्या अनुषंगाने प्रश्नोत्तरे केली. त्यानंतर सायंकाळी त्यांनी सर्व दागिन्यांच्या पावत्या सादर केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीआयडीकडून जबाब नोंदवणे सुरूदरोड्यातील प्रमुख आरोपी अमोल खोतकर याचे २६ मे रोजी एन्काऊंटर झाले. या प्रकरणी सीआयडीचे पथक तपास करत आहे. एन्काउंटरदरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पाच अधिकाऱ्यांचे आत्तापर्यंत जबाब नोंदवल्याचे सूत्रांनी सांगितले.

आरोपींच्या घराची झाडाझडतीतपासादरम्यान अमोलच्या एन्काउंटरमुळे पोलिसांच्या मूळ तपासावर मोठा परिणाम झाला. अमोलच्या घरझडतीव्यक्तिरिक्त अन्य आरोपींच्या कुटुंबाची अपेक्षित चौकशीदेखील झाली नव्हती. त्यामुळे सर्व आरोपींच्या घरांची पुन्हा एकदा झाडाझडती घेऊन कुटुंबाची चौकशी केली जाणार आहे. मंगळवारी काही आराेपींच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरRobberyचोरीCrime Newsगुन्हेगारी