शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

विना तपासणीच १५ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणारे तीन वाहन निरीक्षक निलंबित  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 13:13 IST

औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन वाहन निरीक्षकांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे.

औरंगाबाद : वाहनांची कोणतीही तपासणी न करता थेट योग्यता प्रमाण दिल्यावरून औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातील तीन वाहन निरीक्षकांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताने खळबळ माजली आहे. या कार्यालयात २०१५-१६ या वर्षात जवळपास १५ व्यावसायिक वाहनांना तपासणी न करता योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे आढळले होते. 

वाहनांची कठोर तपासणी करूनच योग्यता प्रमाण देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने २०१३ मध्ये परिवहन विभागाला दिले होते. त्यानंतरही राज्यातील अनेक भागांत वाहनांना कुठलीही तपासणी न करता वाहनांना थेट योग्यता प्रमाणपत्र दिले जात असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाच्या पथकाने २० मार्च व १० एप्रिल २०१८ या काळात औरंगाबाद प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन निरीक्षकांच्या कामांची तपासणी केली.

यात जवळपास १५ व्यावसायिक वाहनांना कोणतीही तपासणी न करता थेट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचे उघडकीस आले. या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका वाहन निरीक्षक योगिता अत्तरदे, किशोर पवार आणि हरीशकुमार पवार यांच्यावर ठेवण्यात आला. याचा अहवाल परिवहन विभागाकडे पाठवण्यात आला. तो गृह विभागाच्या परिवहन विभागाला पाठविण्यात आला. या अहवालावर तात्काळ निर्णय घेण्यात आला. त्यानंतर औरंगाबाद कार्यालयातील ३ वाहन निरीक्षकांसह राज्यातील ३७ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. 

अधिक माहिती सांगता येणार नाही आपण वर्षभरापूर्वीच येथे रुजू झालो आहोत. त्यापूर्वीचे हे प्रकरण असून, याबाबत आपल्याला अधिक काही सांगता येणार नाही.- सतीश सदामते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, औरंगाबाद

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादState Governmentराज्य सरकारsuspensionनिलंबन