सुषमा बोराळकरांचा शहरातील औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक येथे दौरा झाला. यावेळी अध्यक्ष नितीन पाटील यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व खात्री दिली की, येणाऱ्या पदवीधर निवडणुकीमध्ये शिरीष बोराळकर हेच प्रचंड बहुमताने विजयी होतील. यानंतर त्यांनी बँकेच्या विविध अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांनादेखील शिरीष बोराळकरांना पहिल्या पसंतीचे मतदान करण्यासाठी आवाहन केले.
यावेळी त्यांच्यासोबत ॲड. माधुरी अदवंत, विमल तळेगावकर, मंगला वाहेगावकर, प्रतिभा जऱ्हाड यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी उपस्थित होत्या.