शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पाणी योजनेसाठी जीवन प्राधिकरणाकडून सर्वेक्षणाचे काम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 19:52 IST

पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांसह एमजेपीचे अधिकारी सर्वेक्षण करीत आहेत.

ठळक मुद्देशहरासाठी १,६८० कोटी रुपये किमतीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सर्वेक्षणासाठी सात अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे.

औरंगाबाद : राज्य शासनाने मंजूर केलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे. यासाठी ७ कर्मचाऱ्यांचे विशेष पथक तयार केले असून, दहा दिवसांत अहवाल देण्याचे आदेश पथकाला दिले आहेत. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांसह एमजेपीचे अधिकारी सर्वेक्षण करीत आहेत.

राज्य शासनाने शहरासाठी १,६८० कोटी रुपये किमतीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेची अंतिम मंजुरी राज्य शासनाच्या नगरविकास विभागात रखडली आहे. येत्या काही दिवसांत अंतिम मंजुरी मिळेल, असे गृहीत धरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने स्थानिक पातळीवर सर्वेक्षणाचे काम सुरू केले आहे.  महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने सर्वेक्षणासाठी सात अधिकाऱ्यांचे एक पथक तयार केले आहे. या माध्यमातून शहरातील जलकुंभ, त्यांची स्थिती, जलवाहिनींची स्थिती याचे सर्वेक्षण केले जात आहे.

सध्या औरंगाबाद शहरात ६४ जलकुंभ आहेत, त्यापैकी नऊ जलकुंभ वापरात नाहीत. जे जलकुंभ वापरात आहेत, त्यांची स्थिती काय आहे, दुरुस्ती करावी लागणार आहे का, जलकुंभांवर झाडे उगवली आहेत का, ज्या जलकुंभांच्या परिसरात टँकर भरण्याची सुविधा आहे, त्याठिकाणी काय स्थिती आहे, टँकर भरण्याची पद्धत काय आहे, शहरात टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या कशा आहेत. काही ठिकाणी सिमेंटच्या जलवाहिन्या आहेत, तर काही ठिकाणी लोखंडी जलवाहिन्या आहेत. या सर्व जलवाहिन्यांची स्थिती काय आहे, आदी बाबींची पाहणी करून त्याचा सविस्तर अहवाल दहा दिवसांत देण्याचा आदेश पथकाला देण्यात आला आहे. सर्वेक्षणासाठी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील अभियंत्यांची मदत घेतली जात आहे.

योजनेला लवकरच अंतिम मंजुरी01- जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंतच्या सर्वेक्षणाचे काम झाले आहे. शहरातील सर्वेक्षणाचे काम बाकी होते. तेदेखील दहा दिवसांत पूर्ण होईल. 02- पाणीपुरवठा योजनेच्या कामाला नगरविकास खात्याकडून कोणत्याही क्षणी मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. 03- मंजुरी मिळताच संबंधित कंत्राटदार कंपनीला कार्यारंभ आदेश देऊन काम सुरू करता येईल, त्यासाठी सर्वेक्षणाचे काम उपयोगी पडणार आहे.04- मंजुरीनंतर सर्वेक्षणासाठीचा वेळ या कामामुळे वाचेल, असे मानले जात आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी