शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरमधील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या अखेर मॅटकडून रद्द

By सुमित डोळे | Updated: March 22, 2024 11:34 IST

आता आणखी सोळा अधिकाऱ्यांच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष

छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदल्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांपैकी चार पोलिस निरीक्षक तर एका सहायक निरीक्षकाची बदली मॅटने (महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण) रद्द केली आहे. गुरुवारी न्या. व्ही. के. जाधव यांनी या प्रकरणी आदेश दिले. शिवाय, पोलिस आयुक्तांविरोधात अवमान याचिकेविषयी कार्यवाहीकरिता कागदपत्रे द्विसदस्यीय खंडपीठाकडे पाठविण्याचेदेखील त्यांनी आदेशात नमूद केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एका मतदारसंघात तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले अधिकारी व मूळ जिल्हा असलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले होते. २१ डिसेंबर रोजी आयोगाच्या आदेशानंतर राज्य पोलिस विभागात मोठा गोंधळ उडाला होता. काही विशेष पोलिस महानिरीक्षकांसह अधीक्षकांनी याबाबत राज्य पोलिस महासंचालकांकडे पत्राद्वारे विचारणा केली होती. त्यानंतरही पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. परंतु, राज्यभरातून अनेक पाेलिस निरीक्षक, सहायक निरीक्षकांसह उपनिरीक्षकांनी या निर्णयाविरोधात मॅटमध्ये धाव घेतली होती.

या अधिकाऱ्यांची बदली रद्दशहरातून पाेलिस निरीक्षक अशोक गिरी, अविनाश आघाव, दिलीप गांगुर्डे, गणेश ताठे व सहायक निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती. आघाव यांच्या बाजूने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे तर अन्य अधिकाऱ्यांच्या वतीने ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. शुक्रवारी याबाबत आदेश देताना त्यांची बदली रद्द केली. निवडणूक आयोगाच्या पत्रानुसार २६ जानेवारी रोजी अधिकाऱ्यांची बदली झाली होती. ते सध्या अकार्यकारी पदावर कार्यरत असून, त्यांचा निवडणूक कार्य, सामान्य जनतेशी काही संबंध येत नसल्याचे निरीक्षक न्यायालयाने नोंदविल्याचे ॲड. प्रशांत नागरगोजे यांनी सांगितले.

आता १४ अधिकाऱ्यांची मॅटमध्ये धावदरम्यान, अधिकाऱ्यांच्या याचिकेनंतर मॅटने २७ फेब्रुवारी रोजी बदल्यांना स्थगिती दिली होती. मात्र, पोलिस आयुक्तालयामार्फत २९ फेब्रुवारी रोजी संबंधितांना कार्यमुक्त केले गेले. त्याविरोधात संबंधितांनी पुन्हा अवमान याचिकेसाठी अर्ज केला. याबाबत, न्यायाधिकरणाच्या २७ फेब्रुवारी रोजीच्या अंतरिम आदेशाचे पालन न केल्याने पोलिस आयुक्तांविरोधात अवमानविषयी कार्यवाहीकरिता कागदपत्रे द्विसदस्यीय खंडपीठाकडे पाठवावीत, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले. आता निरीक्षक गीता बागवडे यांच्यासह जवळपास १४ पोलिस अधिकाऱ्यांनी बदल्यांविरोधात मॅटमध्ये धाव घेतली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसAurangabadऔरंगाबादTransferबदली