शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णसेवेबरोबर डॉक्टरांनी जोपासला ‘सूर’ ; औरंगाबादमध्ये केले एकापेक्षा एक सुरेल गीतांचे सादरीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2017 18:46 IST

डॉक्टर म्हटले की, रुग्ण, उपचार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालय एवढेच चित्र सर्वसामान्यांच्या नजरेसमोर येते. परंतु शहरातील अनेक डॉक्टर हातात माईक घेऊन व्यासपीठावर एकापेक्षा एक सुरेल गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकत आहेत.

- संतोष हिरेमठ 

औरंगाबाद : डॉक्टर म्हटले की, रुग्ण, उपचार, शस्त्रक्रिया आणि रुग्णालय एवढेच चित्र सर्वसामान्यांच्या नजरेसमोर येते. परंतु शहरातील अनेक डॉक्टर हातात माईक घेऊन व्यासपीठावर एकापेक्षा एक सुरेल गीत सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध करून टाकत आहेत. दैनंदिन व्यस्त जीवनातही रुग्णसेवेबरोबर डॉक्टर ‘सूर’ जोपासत कलेची आराधना करीत आहेत.

आधी वैद्यकीय शिक्षण आणि त्यानंतर रुग्णसेवा, अशा व्यस्त आयुष्यात स्वत:मधील कुठेतरी हरवून गेलेला कलावंत अनेक डॉक्टरांना पुन्हा सापडला आहे. एकमेकांच्या पाठबळामुळे नेहमीच रुग्ण सेवेत मग्न असणारे डॉक्टर स्वत:मधील गायक चांगल्या प्रकारे जोपासत आहेत.  इंडियन मेडिकल असोसिएशनची (आयएमए) कल्चरल कमिटी असून, डॉ. मंजूषा शेरकर, डॉ. वर्षा आपटे, डॉ. प्रशांत सोनवतीकर हे सदस्य आहेत. प्रारंभी ‘आयएमए’च्या स्टेजवर कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये प्रेक्षक हे ‘आयएमए’चे सदस्यच असल्याने मंचावर गायन करणार्‍या डॉक्टरांना फार काही भीती वाटत नव्हती. त्यातून त्यांना प्रोत्साहन मिळत गेले. यामधूनच अनेक डॉक्टर चांगल्या प्रकारे गात असल्याचे समोर आले. 

छोट्या व्यासपीठाच्या पुढे जाऊन गायन करणार्‍या डॉक्टरांसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकतेच मोठ्या व्यासपीठावर ४० डॉक्टरांनी सादर केलेल्या एकापेक्षा एक सरस गीतांनी रसिक श्रोते भारावून गेले. अमित ओक यांच्याकडून गायन, संगीतासंदर्भात मार्गदर्शन मिळाले. गेल्या तीन वर्षांत आता अनेक डॉक्टर चांगले गात असल्याचे लक्षात आले. अगदी प्रसिद्ध गायकांप्रमाणेच सोलो, ड्युएट गीत डॉक्टर सादर करतात. रुग्णसेवा देताना विविध कारणांनी येणारा ताणही दूर होण्यासाठी ही कला महत्त्वपूर्ण ठरत असल्याचा अनुभव डॉक्टरांना येत आहे. 

कला महत्त्वपूर्ण‘आयएमए’च्या कल्चर कमिटीचे उपक्रम डॉ. अनंत कडेठाणकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू झाले. गेल्या तीन वर्षांपासून नियमित कार्यक्रम होतात. नुकतेच मोठ्या व्यासपीठावर डॉक्टरांनी गाणी सादर केली. रुग्णसेवेबरोबर गायनासाठी डॉक्टर बर्‍यापैकी वेळ देतात. ताण दूर होण्यासाठी ही कला महत्त्वपूर्ण ठरत आहे.- डॉ. रमेश रोहिवाल, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन

गायनासाठी प्रोत्साहन आराम मिळावा, डॉक्टरांबरोबर गायनाचाही हाच उद्देश असतो. रुग्णालय, रुग्ण एवढ्याच विश्वापुरते डॉक्टर मर्यादित असल्याचे दिसते. परंतु त्यापलीकडे जाऊन गायनाने एक वेगळे व्यासपीठ दिले. अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या. अनेक डॉक्टरांना गायनासाठी प्रोत्साहन मिळत आहे. ६० ते ७० डॉक्टर गातात. गायनाचा हा प्रवास आणखी वाढतच जाईल.- डॉ. मंजूषा शेरकर, कल्चरल कमिटी, आयएमए

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टर