शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
3
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
4
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
5
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
6
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
7
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
8
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
9
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
10
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
11
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
12
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
13
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
14
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
15
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
16
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
17
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
18
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
19
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
20
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?

नारेगाव कचरा डेपो प्रकरणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2018 12:17 IST

नारेगाव-मांडकी येथे कचरा टाकण्यास कायम बंदी करणार्‍या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले आहे.

औरंगाबाद : नारेगाव-मांडकी येथे कचरा टाकण्यास कायम बंदी करणार्‍या औरंगाबाद खंडपीठाच्या निकालाला महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिकेद्वारे आव्हान दिले आहे. या याचिकेवर सोमवारी (दि. १९) न्या. ए.के. सिकरी आणि न्या. अशोक भूषण यांच्यासमोर सुनावणी झाली असता सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळास नोटीस बजावण्याचा आदेश दिला. याचिकेवर शुक्रवारी (दि.२३ मार्च) सुनावणी होणार आहे, अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अतुल डख यांनी भ्रमणध्वनीवरून दिली. 

गेल्या ३३ वर्षांपासून औरंगाबादेतील कचरा शहरालगतच्या नारेगाव येथील गायरान जमिनीवर टाकण्यात येत होता. येथे कचरा टाकून त्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात औरंगाबाद खंडपीठाने २००३ मध्येच आदेश दिले होते; परंतु पालिकेने कचर्‍यावर प्रक्रिया न करता केवळ त्या ठिकाणी सातत्याने कचरा टाकण्यात आला. या ठिकाणी सध्या २२ लाख टन कचरा साठला आहे. यामुळे परिसरातील पाणी, हवा प्रदूषित झाली असून, नागरिकांना अनेक आजारांना तोंड द्यावे लागत आहे. 

या विरोधात मांडकी, गोपाळपूर, पळशी, पोखरी आणि महालपिंप्री या गावांतील काही नागरिकांनी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करून, नारेगाव येथील कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याबरोबरच नुकसानभरपाई, नागरिकांची आरोग्य तपासणी आणि उपचार, उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कारवाई, अशा विविध मागण्या केल्या होत्या. या याचिकेवर सविस्तर सुनावणीअंती खंडपीठाने याचिका मंजूर करून, नारेगाव येथे कचरा टाकण्यास कायमस्वरूपी मनाईसह विविध आदेश पारित केले होते. या निर्णयाविरोधात महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुमती याचिकेवर सोमवारी (दि.१९) झालेल्या सुनावणीत महापालिकेच्या वतीने पुन्हा म्हणणे मांडण्यात आले, की नारेगाव-मांडकी येथे असलेल्या कचर्‍याच्या निर्मूलनासंदर्भात राज्याच्या मुख्य सचिवांनी सविस्तर शपथपत्र दाखल करून, कालबद्ध कार्यक्रम सादर केलेला आहे. 

येथील कचर्‍यावर प्रक्रिया करण्याकरिता महापालिका बांधील असून, हा प्रकल्प उभारण्याकरिता काही कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे काही दिवस नारेगाव येथे प्रक्रियेकरिता कचरा नेण्यास परवानगी देण्यात यावी. महापालिकेच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी आणि ज्येष्ठ विधिज्ञ जयंत भूषण, तर मूळ याचिकाकर्त्या पाच गावांतील नागरिकांच्या वतीने अ‍ॅड. अतुल डख काम पाहत आहेत.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabadऔरंगाबादSupreme Courtसर्वोच्च न्यायालयHigh Courtउच्च न्यायालय